मुंबई, 12 फेब्रुवारी: कलर्स चॅनेलवरचा ‘डान्स दिवाने’ हा डान्सिंग शो तुम्हाला आठवत असेल. या कार्यक्रमाचे मागचे दोन्हीही सीजन प्रेक्षकांना खूपच आवडले होते. आणि या शो च्या परीक्षक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या अदांवर सुद्धा प्रेक्षक फिदा होते. या वर्षीच्या ऑडीशन सुरु झाल्या आहेत मात्र माधुरी दिक्षित सध्या या वेगळ्याच टॅलेंटने प्रभावित झाली आहे आणि पण या स्पर्धकाने अजून साधी ऑडीशन देखील दिलेली नाही. सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे. आणि याचा वापर करून तुम्ही तुमचं टॅलेंट जगासमोर ठेवू शकता. इथे एका रात्रीत व्हायरल होऊन कोणाचंही नशीब बदलु शकत. असाच एक सोशल मिडीयावरचा व्हिडीओ माधुरी दीक्षित यांनी पहिला आणि प्रभावित होऊन त्यांनी चक्क त्या मुलाला ‘डान्स दिवाने 3’ (Dance Deewane 3) मध्ये घेण्याची घोषणाही करून टाकली. हा व्हिडीओ धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून शेअर केला आहे. माधुरी दीक्षित लिहितात की, ‘ वाह, काय एनर्जी आहे! जगासमोर याची दिवानगी आणण्याची गरज आहे. तर मी त्याचा जलवा दाखवण्यासाठी त्याला ‘डान्स दिवाने 3’ वर घेऊन येणार आहे.
(हे वाचा - बादशहाच्या ‘Top Tucker’ गाण्यावर नॅशनल क्रशचा सुपर जलवा; Youtube वर रश्मिका मंदानाचा धुरळा) या व्हिडीओमध्ये हा मुलगा गोविंदाच्या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. आणि सोबतच संवाद देखील बोलताना दिसुन येतोय. हा व्हिडीओ तसा खूप आधीच व्हायरल झाला होता पण माधुरी दीक्षित यांनी त्याला शेअर केल्या पासून त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. लोक या मुलाच्या प्रतिभेचं कौतुक करत आहेत तसेच एका खऱ्या टॅलेंटला प्लॅटफॉर्म देण्याच्या निर्णयाचं सुद्धा लोकांनी स्वागत केलं आहे.