मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बादशहाच्या 'Top Tucker' गाण्यावर नॅशनल क्रशचा सुपर जलवा; Youtube वर रश्मिका मंदानाचा धुरळा

बादशहाच्या 'Top Tucker' गाण्यावर नॅशनल क्रशचा सुपर जलवा; Youtube वर रश्मिका मंदानाचा धुरळा

रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या (Badshah) 'टॉप टकर' (Top Tucker) या म्युझिक व्हिडिओमधून लोकांना वेड लावलं आहे.

रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या (Badshah) 'टॉप टकर' (Top Tucker) या म्युझिक व्हिडिओमधून लोकांना वेड लावलं आहे.

रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या (Badshah) 'टॉप टकर' (Top Tucker) या म्युझिक व्हिडिओमधून लोकांना वेड लावलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 फेब्रुवारी: दक्षिणात्य अभिनेत्री आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदनाने (Rashmika mandanna) अल्पकालावधीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने दक्षिणेकडील चाहत्यांबरोबरच हिंदी चाहत्यांनांही आपल्या अभिनयाने मोहिनी घातली आहे. अशातच आता रश्मिका मंदानाने प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या 'टॉप टकर' (Top Tucker) या गाण्यामधून लोकांना वेड लावलं आहे. बादशहाचं हे गाणं आज यूट्यूबवर रिलीज झालं आहे.  प्रदर्शनाच्या अवघ्या चार तासातच या गाण्याने युट्युबर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला 4 तासात 12 लाख 42 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तिच्या या गाण्याला चाहत्यांच भरभरून प्रेम मिळत आहे.

चाहते युट्यूबवर कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या गाण्याचं कौतुक करत आहेत. आणि विशेष बाब म्हणजे प्रदर्शनाच्या काही मिनिटातचं हे गाणं युट्युबवर टॉप ट्रेंड झालं आहे. या गाण्यात रश्मिका मंदना फंकी लूकमध्ये दिसत आहे. शिवाय रॅपर बादशहाचा नेहमीचा स्वॅगही गाण्यात कुटून कुटून भरला आहे. या गाण्यात बादशाह आणि रश्मिका व्यतिरिक्त युवराज शंकर राजाही झळकला आहे.

हे ही वाचा-काकांच्या मृत्यूनंतर रणबीर सावरतोय; लवकरच 'ब्रम्हास्त्र'ची कमिटमेंट करणार पूर्ण

हा म्युझिक व्हिडिओ यशराज बॅनरने तयार केला  आहे. तसेच यशराज फिल्म्स युट्युब चॅनेलवरूनच हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. अलीकडेच युट्युबवर या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. या गाण्याच्या टीजरनेही इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. या टीजरमध्ये रश्मिकाची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली होती.

गीतागोविंदम आणि डियर कॉम्रेड यांसारख्या सुपर हिट चित्रपटांतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या अभिनयासोबतच तिच्या हास्यासाठी ओळखली जाते. देशभरातील तरुणाईला तिच्या अभिनयानं वेड लावलं आहे. तिच्या चित्रपटातील निवडक दृश्य अनेकांच्या वॉट्सअॅप स्टेटसला पाहायला मिळतात. म्हणून ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. ती सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिचा अल्लू अर्जुनसोबतचा हा पहिलाच चित्रपट असल्याने दोघांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता दाटली आहे.

First published:

Tags: Bollywood News