मुंबई, 06 मार्च: विवियन डिसेना हा हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात जास्त लोकप्रिय अभिनेता आहे. या अभिनेत्याने प्यार की ये एक कहानी आणि मधुबालासह अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये काम केलेलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो अभिनक्षेत्रापासून दूर आहे. या अभिनेत्याने सध्या त्याच्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे. पण असं असलं तर विवियन डिसेना त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. त्याने नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवले आहे. सुमारे 2 वर्षांपूर्वी विवियनने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विवियन डिसेना त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा बोलत नाही. त्याने नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवले आहे. आता, समोर आलेल्या माहितीनुसार विवियानने गुपचूप लग्न केले आहे. सुमारे 2 वर्षांपूर्वी विवियनने त्याची पत्नी वहबिज दोरबाजीपासून घटस्फोट घेतला. रिपोर्ट्सनुसार, विवियन डिसेनाचे नाव इजिप्तमध्ये राहणाऱ्या नौरान अलीसोबत जोडले जाऊ लागले. दरम्यान, आता विवियन आणि नौरान अली यांनी गुपचूप लग्न केले आहे. एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर विवियन डिसेना आणि नौरान अली यांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. Amitabh Bachchan: मोठी बातमी…अमिताभ बच्चन यांचा अपघात; शूटिंगदरम्यान झाली गंभीर दुखापत हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विवियन डिसेनाने इजिप्शियन गर्लफ्रेंड नौरान अलीशी लग्न केले आहे. त्याच्या लग्नाला जवळपास एक वर्षा पेक्षा जास्त काळ झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विवियन मुंबईतील लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये पत्नीसह राहात आहे. मात्र, या वृत्तांवर विवियन डिसेनाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
विवियन डिसेनाच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. विवियन डिसेनाने लग्नाच्या बातम्यांवर आतापर्यंत मौन बाळगले आहे. विवियनची बायको नौरान अली पत्रकार आहे. विवियन आणि नौरनची पहिली भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. यानंतर दोघे खूप चांगले मित्र बनले. काही दिवसांनंतर विवियन आणि नौरनच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले.
विवियनने लोकप्रिय टीव्ही मालिका ‘कसम से’ मध्ये सहायक भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नंतर, प्यार की ये एक कहानी या रोमँटिक मालिकेत त्याने व्हॅम्पायरची भूमिका केली. विवियनला खरी ओळख टीव्ही शो मधुबालामधून मिळाली.याने ‘मधुबाला’मध्ये आरकेची भूमिका साकारली होती आणि नंतर ‘शक्ती’ या शोमध्ये हरमन सिंगच्या भूमिकेत दिसला होता. कलर्स टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘सिर्फ तुम’मध्ये विवियन डिसेना अखेरचा दिसला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मालिकाविश्वपासून दूर आहे.