‘काली’ या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर कॅनडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अंडर द टेंट’ या प्रोजेक्ट अंतर्गत प्रदर्शित करण्यात आलं. कॅनडामधील भारतीय उच्चायोगाच्या वतीने पत्रक काढून या पोस्टरचा निषेध करण्यात आला. पोस्टरमध्ये असलेला आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडाच्या ज्या म्युझिअममध्ये पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं तिथल्या लोकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली होती. Kaali पोस्टरला दणका; भारताच्या विनंतीवर ट्विटरची कारवाई, पोस्टर हटवले कोण आहे लीना? तमिळनाडू राज्यातील मदुराई शहराच्या दक्षिण भागात एका छोट्या गावात लीनाचा जन्म झाला. महाराजापुरम हे तिच्या गावाचं नाव आहे. तिचे वडील कॉलेजमध्ये लेक्चरर होते. त्यांच्या गावात अशी प्रथा होती, की एखादी मुलगी वयात आल्यानंतर काही वर्षांमध्येच त्यांचं लग्न त्यांच्या मामासोबत लावून द्यायचं. लीनाचंही लग्न तिच्या मामासोबत ठरलं होतं. मात्र, लग्नाची तयारी सुरू असतानाच ती घर सोडून चेन्नईला पळून गेली. त्यानंतर तिने इंजिनीअरिंग आणि आयटी क्षेत्रातसह अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि नंतर ती फिल्म इंडस्ट्रीत दाखल झाली. ‘काली’ची निर्माती असलेली लीना मणिमेकलाई या आधीही सिनेमांवरुन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या पूर्वीही आपल्या डॉक्युमेंट्री फिल्म्सच्या ती चर्चेचा विषय ठरली होती. देवदासी प्रथेवर बनवलेली माथम्मा (Mathamma) या डॉक्युमेंट्रीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला. दलित महिलांवर होणाऱ्या हिंसेबाबत बनवलेली पराई (Parai) आणि धनुषकोडीमधील मच्छिमारांवर बनवलेली सेंगदाल (Sengadal) या डॉक्युमेंट्री फिल्म्समुळे निर्माती मणिमेकलाई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.Elsewhere…. pic.twitter.com/NGYFETMehj
— Leena Manimekalai (@LeenaManimekali) July 7, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.