मुंबई, 11 मार्च: घरातून काम केल्यामुळे तसेच हालचाल न केल्याने तुम्हाला बर्याच शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे? जर उत्तर होय असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. अशी संधी जी आपण घरी राहून तंदुरुस्त राहाल आणि आपल्याला शानदार बक्षीस देखील मिळेल.
जिओ न्यूज आणि प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस तज्ञ शिल्पा शेट्टी कुंद्रा एकत्रितपणे 7 दिवसांचे फिटनेस चॅलेंज आणत आहेत. या स्पर्धेत भाग घेत आपण शिल्पा शेट्टी कुंद्राकडून धमाकेदार बक्षीस मिळवू शकता.
मोहिमेत कसे सहभागी व्हावे?
-या मोहिमेमध्ये भाग घेण्यासाठी, आपल्याला जियोन्यूज अॅप डाउनलोड करावे लागेल किंवा JioNews.com वेबसाइटवर जावे लागेल.
-यानंतर तुम्हाला शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे योग, व्यायाम, ध्यान यासंबंधित व्हिडिओ पहावे लागतील.
-नंतर जिओ न्यूजच्या फेसबुक पेजवर व्हिडिओशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्याव्या लागतील.
शिल्पा शेट्टींकडून शिकून घ्या ‘निरोगी राहा मस्त राहा' हा मंत्र आणि जिंका बरीच बक्षिसे, कसे ते पाहा.. @TheShilpaShetty @JioNews pic.twitter.com/syoy7w2y2q
— News18Lokmat (@News18lokmat) March 11, 2021
शिल्पा शेट्टी कुंद्राने आपल्या फिटनेसमुळे सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींना टक्कर दिली यात काही शंका नाही. ती स्वतःला तंदुरुस्त ठेवतेच शिवाय लोकांना फिटनेसविषयी जागरूक करते.
(हे वाचा- दीपिका पदुकोण आणि रणवीरचा हटके डान्स; VIDEO प्रचंड व्हायरल)
इतकेच नाही तर शिल्पा शेट्टी कुंद्राचा Simple Soulful नावाचे फिटनेस अॅपदेखील आहे ज्यामध्ये योग, व्यायाम, रोग प्रतिकारशक्ती यासारख्या आरोग्याच्या समस्यांविषयी माहिती मिळू शकेल. या अॅपमधील फिटनेस व्हिडिओ पाहून आपण घरी व्यायाम देखील करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Fitness, Health, Money, Reliance Jio, Shilpa shetty, Wellness