मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आमचं सर्वकाही संपलं..' प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढता लढता आई-वडील कंगाल

'आमचं सर्वकाही संपलं..' प्रत्युषाच्या मृत्यूनंतर न्यायासाठी लढता लढता आई-वडील कंगाल

 प्रत्युषा अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली होती. मात्र आपल्या मुलीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आई वडील आहेत.

प्रत्युषा अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली होती. मात्र आपल्या मुलीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आई वडील आहेत.

प्रत्युषा अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली होती. मात्र आपल्या मुलीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आई वडील आहेत.

मुंबई 29 जुलै : दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला (Pratyusha Bannerjee) जावून आता 5 वर्षे उलटली आहेत. आनंदी बनून घराघरात पोहोचलेली प्रत्युषा अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली होती. मात्र आपल्या मुलीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही आई वडील आहेत. यावेळी आपलं सगळं काही संपलं असल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलं आहे.

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रत्युषाची ओळख होती. जमशेदपूरहून मुंबईला ती अभिनेत्री बनण्यासाठी आली होती मात्र काही काळातच तिची जीवन यात्रा संपली. 1 एप्रिल 2016 साली तिने आपलं जीवन संपवलं होतं. पोलिसांना ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. तेव्हा तिने आत्महत्या केली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असं प्रत्युषाच्या आई वडिलांनी म्हटलं होतं. त्याचीच केस ते अद्यापही लढत आहेत.

विवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खुलासा

प्रत्युषा ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. अतिशय लाडात वाढलेल्या प्रत्यूषाच्या जाण्याने आई वडिलांना मोठा धक्का बसला होता तर अजूनही ते त्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी म्हटलं की, "आता बोलण्यासाठी काय राहिलं आहे? आमचं तर सगळं काही लुटलं आहे. ज्या दिवशी आमची मुलगी गेली त्याचं दिवशी आमचं सगळं काही संपलं. या घटनेनंतर असं वाटतं आहे की एखाद वादळ आलं आणि आमचं सगळं काही घेऊन गेलं. केस लढता लढता आमचं सगळं काही संपलं. आमच्याकडे एक रुपयाही राहिला नाही. अनेकदा कर्ज घेण्याचीही वेळ आली."

मुलीच्या आठवणीत त्यांनी म्हटलं की "तिच्याशिवाय आमचं कोणीच नव्हतं. तिनेच आम्हाला मोठ्या उंचीवर पोहोचवलं होतं तिच्या नंतर आता पुन्हा जमिनीवर आलो आहोत. आता एका खोलीत राहण्याची वेळ आली आहे. आयुष्य कसतरी पुढे सरकत आहे."

या कठीण प्रसंग नंतरही त्यांनी हिम्मत सोडली नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की "पैश्यांची नक्कीच कमी आहे पण हिम्मत अजूनही तिचं आहे. असही एक बाप कधीच हारत नाही. मी माझ्या मुलीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. एक ना एक दिवस आम्हाला न्याय नक्की मिळेल". अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. बॅनर्जी यांनी पुढे सांगितल की प्रत्युषाची आई चाइल्ड केअर सेंटर मध्ये काम करते तर ते काही गोष्टी लिहितात.

First published:
top videos

    Tags: Death, Entertainment, Tv actress