मुंबई 24 जुलै : 80 च्या दशकातील एक सशक्त अभिनत्री म्हणून स्मिता पाटील (Smita Patil) या ओळखल्या जातात. अभिनेत्रींची तोपर्यंत चालत आलेली प्रतिमा बदलण्याचं काम त्यांनी केलं होतं. अनेक विवादांना त्यामुळे त्यांना सामोरंही जावं लागलं होतं. हिंदी चित्रपटातील दुबळ्या महिलेची भूमिकाच त्यांनी काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. व कठोर आणि सशक्त महिलांच्या भूमिका त्यांनी साकारल्या. त्यातीलच एक म्हणजे ‘चक्र’ (Chakra) हा चित्रपट. या चित्रपटाच्या पोस्टरने 80 च्या दशकात मोठी खलबळ उडवली होती.
अभिनेते नसरुद्दीन शाह आणि कुलभूषण खरबंदा यांच्यासोबत स्मिता यांनी काम केलं होतं. त्यातील त्यांच पोस्टर हे चर्चेचा तसेच विवदाचा प्रश्नही बनला होता. एका हॅन्डपम्प खाली अतिशय कमी कपड्यांत स्मिता अंघोळ करत आहेत, अशा प्रकारचं ते पोस्टर होतं. पण डिस्ट्रीब्युटर्सनी त्यांना कोणतीही कल्पना न देता हे पोस्टर सर्वत्र लावलं होतं. त्यामुळे स्मिता या त्यावेळी फारच संतापल्या होत्या.
त्यावेळी स्मिता यांनी एक मुलाखत दिली होती. पत्रकार नलिनी सिंग यांना दिलेल्या मुलाखतीत ‘अर्धनग्न पोस्टर तुम्ही कसं प्रदर्शित होऊ दिलं?’ यावर स्मिता यांनी म्हटलं होतं की, “माझ्या हातात ही गोष्ट असती तर मी अजिबात होऊ दिली नसती. चक्र एक अतिशय चांगला चित्रपट आहे. पण एक महिला जी झोपडीत राहते. तिची अंघोळ पाहायला तुम्ही थांबणार नाही का? हा ही विचार करणार नाही की तिला राहायला जागा नाही तर अंघोळ करायला कुठून जागा असेल. पण पोस्टर्सविषयी सगळं काही डिस्ट्रीब्युटर्स पाहातात.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “भारतीय प्रेक्षकांवर ही गोष्ट लादली गेली आहे. कारण असही नको व्हायला की, हे पाहा यात सेक्स आहे. महिलांच अर्धनग्न शरिर आहे. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहायला या. हे फार चुकीचं आहे. चित्रपट जर खऱ्या मनाने बनवला असेल तर तो नक्की चालेल. फक्त अशा पोस्टर्सनी काही होणार नाही.”
दमदार अभिनेत्री स्मिता यांनी फारच लवकर जगाचा निरोप घेतला होता. 1986 साली मुलगा प्रतिक बाबर यांच्या जन्माच्या केवळ पंधराच दिवसांनंतर स्मिता यांचं निधन झालं होतं. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या शरिरात काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाले होते. आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Smita patil