मुंबई २३ जुलै : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) हा पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लिल चित्रफीती (Pornography) प्रकणात त्याची चौकशी सुरू आहे. तर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 19 तारखेला त्याला अटक झाल्यानंतर 23 तारखेपर्यत कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता त्याची कोठडी 27 जुलै पर्यत वाढवण्यात आली आहे. तर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी केली जात आहे. मुंबई क्राइम ब्रँचनुसार पोलिसांच्या हाती असे काही पुरावे लागले आहेत जे राजच्या बँक खात्याशी सलंग्न आहेत. यावरून असं लक्षात येत आहे की, राजने पॉर्नमधून येणारे पैसे सट्टयावर लावले होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, राजच्या अटकेनंतर मोठ्या प्रमाणावर डेटा त्याच्या ऑफिसमधून डिलीट करण्यात आला आहे.
राज कुंद्रासोबत क्राईम ब्रँचची टीम पोहोचली शिल्पाच्या घरी; समोरा-समोर होऊ शकते चौकशीशिल्पा शेट्टी खरचं पतीच्या व्यवसायापासून अपरिचित? पतीच्या अटकेनंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) अडचणीही वाढल्या आहेत. पोलिसांनी शिल्पा आणि राज यांच्या राहत्या घरी धाड मारत चौकशीला सुरुवात केली आहे. यात आता शिल्पासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. अश्लिल चित्रफितींची शिल्पाला माहिती होती की नाही, नव्हती तर कधी मिळाली? राज कुंद्रा ऑनलाइन अँपच्या माध्यामातून कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचा याची तिला अजिबातच माहिती नव्हती का? तर राजसोबत घरी कोण कोण यायचं व चित्रपटांसंबधी नक्की काय बोलंणं व्हायचं असे प्रश्न शिल्पासमोर उपस्थित केले जाणार आहेत. याशिवाय राजच्या अटके नंतर मोठ्या प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आला. तर तो नक्की का डिलीट केला? त्यामागे नक्की काय कारण होतं. पुरावे मिटवण्याच्या दृष्टीने तो डिलीट केला का असे अनेक प्रश्न क्राअइम ब्रँच शिल्पासमोर उपस्थित करणार आहे.