नुतन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांच करिअर अगदी य़शाच्या शिखरावर असतानाचं त्यांनी रजनिश बहल यांच्याशी विवाह केला. रजनिश यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबध नव्हता. ते एक लेफटंन्टं नेव्ही कमांडर होते. पण याचा नुतन यांच्या फिल्मी करिअरवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच काम सुरूच होतं.View this post on Instagram
फॅमेली मॅनची पत्नी कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री? पाहा साऊथस्टार प्रियामणीचा प्रेरणादायी प्रवास
नुतन यांची विशेष चर्चा रंगली ती 60 च्या दशकात त्यांनी स्विमसुट परिधान करत चित्रपटात सिन दिल्यानंतर. त्या काळी स्विमसुट परिधान करणं हे मोठं धाडसी काम होतं. पण नुतन यांनी बिनधास्त हे आवाहन पेलत अगदी आत्मविश्वासाने स्विमसुट परिधान करून चित्रपटात सिन दिले होते. 'दिल्ली का ठग' अस या चित्रपटाचं नाव होतं.नुतन आणि रजनिश यांचा मुलगा म्हणजेच अभिनेते मोहनिश बहल हे देखिल चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांत ते दिसले होते. त्यांची मुलगी प्रनुतन बहल हिने देखिल बॉलवूडमध्ये नोटबूक या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. मोहनिश हे सोशल मीडियावर आपल्या आईच्या अनेक आठवणी शेअर करत असतात. तसेच त्यांच्या चित्रपटातील काही क्लिप्सही ते चाहत्यांसाठी पोस्ट करतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment