Home /News /entertainment /

20 दिवसांपासून ICU मध्ये आहेत Lata Mangeshkar, कुटुंबाने दिली नवी Health Update

20 दिवसांपासून ICU मध्ये आहेत Lata Mangeshkar, कुटुंबाने दिली नवी Health Update

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना मागच्या 20 दिवसापासुन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 27 जानेवारी- भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना मागच्या 20 दिवसापासुन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना (Corona) आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आज त्यांच्या ट्विटरवरून त्यांच्या तब्येतेविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, लता मंगेशकर यांना ICU मध्ये डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी उपचार घेत आहेत. लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या अधिकृत ट्वीटरव अकाऊंटवरून  माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, लतादीदी ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबई येथे ICU मध्ये उपचार घेत आहेत. त्यांना आज सकाळी एक्सट्यूबेशन (ऑफ इनवेसिव्ह व्हेंटिलेटर) चाचणी देण्यात आली आहे. सध्या, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. पण त्या डॉ. प्रतित समदानी यांच्या निरिक्षणाखाली राहतील. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही प्रत्येकाचे आभारी आहोत. त्यांच्य कुटुंबाकडून हे ट्वीट करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हटल्यावर त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मिडीयावर अनेक व्हायरल मेसेज येत होते. यानंतर मंगेशकर कुटुंबाच्यावतीने चुकीच्या बातम्या पसरू नका असे आवाहन करण्यात आले आहे. वाचा- धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटामुळे सुपरस्टार रजनीकांत चिंतेत, अशी सुरुय धडपड लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करण्यास सुरू केलं. त्या वडिलांसोबत संगीत नाटकात अभिनय करत होत्या. यानंतर 13 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. भारत रत्न, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांनी विविध भारतीय भाषांमध्ये 30 हाजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी 'अजीब दास्तां हैं ये', 'प्यार किया तो डरना क्या', 'नीला आसमान सो गया' आणि 'तेरे लिए' यासारखी कितीतरी लोकप्रिय गाणी गायली आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या