Home /News /entertainment /

लेकीच्या घटस्फोटामुळे सुपरस्टार रजनीकांत चिंतेत! धनुष-ऐश्वर्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी सुरुय धडपड

लेकीच्या घटस्फोटामुळे सुपरस्टार रजनीकांत चिंतेत! धनुष-ऐश्वर्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी सुरुय धडपड

सुपरस्टार रजनीकांतसुद्धा (Rajinikanth) आपल्या लेकीच्या घटस्फोटामुळे चिंतेत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं म्हटलं जात आहे.

    मुंबई, 27 जानेवारी-   साऊथमधील   (South Stars)  सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणारे धनुष   (Dhanush)  आणि ऐश्वर्या (Aishwarya)  आता विभक्त होत आहेत. दोघांनी नुकताच आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकं त्यांच्यामध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी चाहते धडपडत आहेत. दरम्यान असं समोर आलं आहे की, सुपरस्टार रजनीकांतसुद्धा   (Rajinikanth)  आपल्या लेकीच्या घटस्फोटामुळे चिंतेत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 17  जानेवारीला धनुष आणि ऐश्वर्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परंतु या विषयवार बोलताना धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी त्याला 'कौटुंबिक वाद' समजलं होतं. तर दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांत यांना आपल्या लेकी आणि जावयाच्या घटस्फोटाने मोठा धक्का बसला आहे. Wion च्या रिपोर्टनुसार, सुभाष के झा यांना जवळच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे, मुलगी आणि जावयाच्या या निर्णयाचा रजनीकांत याना धक्का बसला आहे. धनुष आणि ऐश्वर्याने आपल्यातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावं अशी त्यांची इच्छा आहे. धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण झाल्याचं म्हटलं जातं. परंतु भांडण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. याआधीही त्या दोघांमध्ये अनेक टोकाचे मतभेद झाले आहेत. परंतु प्रत्येक वेळी रजनीकांत यांनी या परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यावेळी परिस्थिती हातातून बाहेर गेलेली दिसत आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटावर सुपरस्टार रजनीकांत यांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा कॅमेरासमोर कोणतंच विधान केलेलं नाहीय. परंतु ते आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या फारच जवळ आहेत. अनेकवेळा सोशल मीडियावर या तिघांचे सुंदर फोटो व्हायरल होत असतात.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South indian actor

    पुढील बातम्या