लता दीदींची Instagram वर एंट्री, फक्त 'या' 5 व्यक्तींना करतात फॉलो

लता दीदींची Instagram वर एंट्री, फक्त 'या' 5 व्यक्तींना करतात फॉलो

लता मंगेशकर यांनी सोमवारी अधिकृतरित्या इन्स्टाग्रामवर एंट्री घेतली. त्या फक्त 5 व्यक्तींना फॉलो करतात.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : आजकाल सर्वांनाच सोशल मीडियाची क्रेझ असलेलं आपण पाहतो. आज सोशल मीडिया वापरत नाही असं क्वचितच कुणीतरी सापडेल. आज सोशल मीडिया ही सेलिब्रटींचीही गरज बनली आहे. पण सोशल मीडियाच्या या युगात काही असेही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी अद्याप फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर त्यांची अकाउंट तयार केलेली नाहीत. असंच एक नाव होतं लता मंगेशकर ज्यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार केलं.

लता मंगेशकर यांनी सोमवारी अधिकृतरित्या इन्स्टाग्रामवर एंट्री घेतली. नुकत्याच तयार केलेल्या या अकाउंटवर लता दीदींना 5 हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करत आहेत. लता दीदींनी आता पर्यंत फक्त दोन पोस्ट केल्या आहेत आणि त्या अवघ्या 5 व्यक्तींना फॉलो करतात. या 5 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan), सचिन तेंडुलकर, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा समावेश आहे.

जेव्हा ट्रम्प-मोदींसाठी अमेरिकन दूतावास गातं हे धम्माल गाणं, पाहा VIRAL VIDEO

 

View this post on Instagram

 

Namaskar. Aaj pehli baar aap sabse Instagram pe jud rahi hun.

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar) on

शनिवारी 28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांनी 90 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या ज्याच रेकॉर्डिंग मोदींनी रविवारी मन की बातमध्ये सर्वांना ऐकवलं. पंतप्रधानानी त्यांच्या परदेश दौऱ्या अगोदर लता दीदींना शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी लता दीदींना सांगितलं की, त्यांना लता दीदींच्या घरी जाऊन गुजराती पद्धतीचं जेवण जेवायला आवडेल.

'ही' व्यक्ती आहे शाहरुख खानची कार्बन कॉपी, PHOTO पाहून तुम्ही व्हाल थक्क!

पंतप्रधान मोदी लता दीदींना म्हणाले, 'मी जेव्हा पुढच्या वेळी तुम्हाला भेटेन त्यावेळी तुम्ही स्वतः तयार केलेला एखादा गुजराती पदार्थ नक्कीच खाईन' याशिवाय अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सुद्धा 7 मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर करत लता दीदींना शुभेच्छा दिल्या होत्या.

Bigg Boss मुळे होणार सलमान खानचं मोठं नुकसान, काय आहे यामागचं कारण?

====================================================

VIDEO: प्रकाश आंबेडकर आज उमेदवारांची यादी जाहीर करणार? इतर टॉप 18 बातम्या

Published by: Megha Jethe
First published: October 1, 2019, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading