मुंबई, 30 सप्टेंबर : हुबेहूब बॉलिवूड कलाकारांसारखी दिसणारी दुसरी व्यक्ती सापडणं आता काही नवी गोष्ट नाही. आतापर्यंत सलमान खान, सैफ अली खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा कतरिना कैफ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती सापडल्या आहेत. त्यानंतर आता यात शाहरुख खानची ‘हमशकल’ असलेली व्यक्ती सापडली आहे. या व्यक्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. ही व्यक्ती जॉर्डनमधील असून तो जवळपास शाहरुख सारखाच दिसतो. यामुळे मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता वाढत आहे. त्याचं नाव Akram al-Issawi असं असून त्याच्या फोटोंवर अनेकांनी तो शाहरुख सारखा दिसतो अशा प्रकारच्या कमें केल्या आहेत. कतरिनाच सलमानचं खरं प्रेम, Bigg Boss 13च्या ग्रँड प्रीमियरमध्ये सापडला पुरावा!
फ्रीप्रेस जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका चाहत्यानं अक्रम बद्दल अधिक माहिती दिली आहे. अक्रम शाहरुख सारखा दिसतो आणि त्यानं 2018 मध्ये Al Arabiya ला एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये ‘अभिनेत्यासारखं दिसत असल्याचा आनंद आहे पण त्याच्या सारखा दिसतो हे ऐकायला आवडत नाही’ असं अक्रमनं सांगितलं होतं. ‘अब तू किसी लड़की को हाथ तो लगा के दिखा…’, Mardaani 2 चा दमदार Teaser रिलीज
सध्या अक्रमचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याच्या या फोटोंवर शाहरुखच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. काहींनी त्याला दुसरा शाहरुख म्हटलं आहे तर तो शाहरुखच्या नावावर तो फक्त अटेंनशन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असं काहींचं म्हणणं आहे. Viju Khote Death : सरदाराचं ‘नमक’ खाण्यासाठी कालियाला मिळाले होते एवढे पैसे ============================================================== VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले…