मुंबई, 20 जानेवारी: भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital Mumbai) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर सतत त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांच्या परवानगीनंतर लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ICU लतादीदींवर उपचार सुरु मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांची टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. लतादीदींच्या तब्येतीत सध्या सुधारणा होत आहेत. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉक्टरांच्या परवानगीनंतर मिळणार डिस्चार्ज लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना घरी आणले जाईल. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालवली असल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र लतादीदींच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.