मुंबई 5 जुलै**:** नकाब या चित्रपटातील ‘एक दीन तेरी बाहों मे’ या गाण्यातून नावारुपास आलेला जावेद अली (Javed Ali) आज भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हिंदी, तमिळ, तेलुगु, मराठी अशा विविध भाषांमध्ये त्याने गाणी गायली आहे. (Javed Ali song) आज जावेदचा वाढदिवस आहे. (Javed Ali birthday) 38 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विविध गाण्यांच्या माध्यमातून गेली दोन दशकं सातत्यानं रसिकांचं मनोरंजन करणारा जावेद आज यशाच्या शिखरावर आहे. परंतु हे यश त्याला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यामुळे मिळालं असं तो मानतो. लतादीदींनी त्याला एक भेटवस्तू दिली होती. अन् या भेटीसोबतच यश त्याच्या नशीबात चालून आलं असं तो मानतो. पाहूया अशी कुठली गोष्ट त्याला लता दीदींकडून मिळाली होती? OMG! साउथ स्टार्सच्या या महागड्या बाईक्सची किमंत माहीत आहे का? पाहा कोणाकडे आहे कोणती गाडी जावेद दोन वर्षांपूर्वी सोनी वाहिनीवरील सुपरस्टार सिंगर या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत होता. त्यावेळी एका 13 वर्षांच्या मुलानं ‘सोला बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं गायलं होतं. या गाण्यावर प्रतिक्रिया देत असताना त्यानं हा लतादीदींचा किस्सा सांगितला होता. शाहरुख खान झाला बेरोजगार? आलिया भट्टकडे करतोय काम देण्याची विनंती जावेदच्या करिअरची खरी सुरुवात ए.आर.रेहमान यांनी दिग्दर्शित केलेल्या किलीमांजारो या गाण्यातून झाली. एंथरीन या दाक्षिणात्य चित्रपटासाठी त्यानं हे गाणं गायलं होतं. हे गाणं लता मंगेशकर यांना प्रचंड आवडलं. त्यांनी स्वत: फोन करुन जावेदची स्तुती केली व उज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्याचं कौतुक करण्यासाठी लतादीदींनी एक कुराणची प्रत त्याला भेटवस्तु म्हणून दिली. लतादीदींनी स्वत: स्पर्श केलेल्या त्या कुराणमुळे जावेदचं आयुष्य बदललं असं तो मानतो. त्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर त्याला मिळू लागल्या. देश-विदेशात मोठमोठ्या कंपन्या त्याला लाईव्ह स्टेज शोसाठी विचारू लागले. त्या भेटवस्तूसोबत त्याच्या आयुष्यात लक देखील चालून आलं असं जावेद या शोमध्ये म्हणाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







