मुंबई, 6 फेब्रुवारी: देशाचे आयकॉन म्हणून ज्यांचा उल्लेख होऊ शकतो त्या यादीत लता मंगेशकर यांचं अढळस्थान आहे. याच यादीत नंतर क्रीडाक्षेत्रातलं एक नाव अलगद येऊन बसलं. दोन्ही नावं मराठी आणि महाराष्ट्राला अभिमान ठरणारी. अर्थातच दुसरं नाव सचिन तेंडुलकरचं. या दोघांची कारकीर्द घडवायला एकच तारीख महत्त्वाची ठरली. एवढंच नाही तर याच तारखेने भारताच्या नावलौकिकालाही एक वेगळी झळाली दिली. ही तारीख होती 16 डिसेंबर. 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 16 डिसेंबर 1971 रोजी 90 हजार पाक सैनिकांसह त्यांच्या जनरल ए. के.नियाजींनी भारतापुढे शरणागती पत्करली होती. भारत-पाक युद्धात झालेल्या देशाच्या सरशीचा हा विजय दिवस. या दिवसानंतर जगभरात भारताची वेगळी बलाढ्य प्रतिमा समोर आली. या विजयाने देशाची पुढची कारकीर्द बहरली. हे वाचा- ‘सर्व देवाच्या इच्छेने होतं’,लता दीदींनी का केलं नाही लग्न?स्वत:चं केलेला खुलासा याच दिवसाच्या बरोब्बर 19 वर्षांनी पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला धूळ चारली पण ते रणांगणावर नव्हे तर खेळाच्या मैदानावर. एका 16 वर्षाच्या मिसरूडही न फुटलेल्या मुलाने पेशावरच्या पीचवर त्या वेळच्या जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला दणदणीत तीन षटकार ठोकून पार घायकुतीला आणलं. एका ओव्हरमध्ये 27 रन्स ठोकणारा हा मुलगा होता सचिन तेंडुलकर. 16 डिसेंबरलाच देशाला हा खणखणीत आयकॉन पहिल्यांदा सापडला. कर्मधर्म संयोग असा की, याच विजय दिवसाच्या बरोब्बर तीस वर्षं अगोदर भारताला आपली गानकोकिळा गवसली होती. 16 डिसेंबर 1941 रोजी लता मंगेशकर यांनी रेडिओसाठी पहिल्यांदा स्टुडिओच 2 गाण्यांचं रेकॉर्डिंग केल होतं.
16 दिसम्बर 1941 को,ईश्वर का पूज्य माई और बाबा का आशिर्वाद लेकर मैंने रेडीओ के लिए पहली बार स्टूडीओ में २ गीत गाए थे.आज इस बात को 80 साल पूरे हो रहे हैं.इन 80 सालों में मुझे जनता का असीम प्यार और आशिर्वाद मिला है,मुझे विश्वास है की आपका प्यार,आशिर्वाद मुझे हमेशा यूँही मिलता रहेगा. pic.twitter.com/YwFTkkPMnb
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 16, 2021
लता मंगेशकरांनी स्वतःच या पहिल्या रेकॉर्डिंगच्या आठवणी ट्वीट करून सांगितल्या होत्या. 2021 मध्ये त्यांनी केलल्या Tweet मध्ये ही आठवण आहे. हेही वाचा- पहिल्या गाण्यासाठी फक्त 25 रुपये मिळालेल्या लतातदीदींनी नंतर कमवली इतकी संपत्ती देशाची प्रतिमा उंचावणाऱ्या या दिवशीच देशाला प्रतिमा उंचावण्यास हातभार लावणारे दोन दिग्गज कलाकार सापडले हा एक दुर्मीळ योगायोग. यापैकी लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारीला या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांचा गोडवा भारताबरोबर कायम राहणार आहे.