भारतीय गानकोकिळा अशी लता मंगेशकर यांची ओळख आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी आज दीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
आज लता दीदींबद्दल अनेक न ऐकलेल्या गोष्टी समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे दीदींचं कार कलेक्शन. लता मंगेशकर यांच्याजवळ मोठं कार कलेक्शन असल्याचं म्हटलं जातं. आज आपण त्याबद्दलच पाहणार आहोत.
लता दीदींना कार्सची मोठी आवड होती. त्यांचं कार कलेक्शनही मोठं होतं. त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक शानदार कार होत्या.
त्यांनी एका मुलाखतीत त्यांना कार्स अतिशय आवडत असल्याचंही म्हटलं होतं. लताजींनी सर्वात आधी स्वत:साठी एक शेवरोले (Chevrolet) खरेदी केली होती.
मध्यप्रदेशातील इंदूरमधून त्यांनी ही कार खरेदी केली होती. ही कार लता दीदींनी आईसाठी खरेदी केली होती.
लता मंगेशकर यांना वीरजाराच्या म्यूझिक रिलीजवेळी यश चोप्रा यांनी मर्सिडीज कार (Mercedes) गिफ्ट केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 370 कोटी रुपये आहे. लता दीदींचं घर मुंबईतील पेडर रोडवर असून त्यांच्या बंगल्याचं नाव प्रभाकुंज भवन आहे.