मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पतीच्या उपचारासाठी अनवाणी धावल्या, बारामतीच्या लता करेंची कथा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित

पतीच्या उपचारासाठी अनवाणी धावल्या, बारामतीच्या लता करेंची कथा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित

‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ (Lata Bhagwan Kare) या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला आहे. मी कल्पनाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया बारामतीच्या लताबाईंनी दिली आहे.

‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ (Lata Bhagwan Kare) या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला आहे. मी कल्पनाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया बारामतीच्या लताबाईंनी दिली आहे.

‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ (Lata Bhagwan Kare) या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला आहे. मी कल्पनाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया बारामतीच्या लताबाईंनी दिली आहे.

पुणे 24 मार्च : एक महिला अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या संसाराता गाडा चालवण्यासाठी अपार कष्ट करते मात्र याच संघर्षामुळे एक दिवस ती स्टार बनते, ऐकायला एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही कथा घडली आहे पुण्याच्या बारामती तालुक्यात. नुकतंच बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्यावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ (Lata Bhagwan Kare) या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला आहे. पतीच्या आजारावरील औषधोपचारासाठी अनवाणी धावून मॅरेथॉन जिंकणा-या लता करे यांच्या संघर्षावर या सिनेमाची कथा आधारित आहे. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका अतिसामान्य कुटुंबात कष्ट करुन प्रपंच करणा-या माझ्यासारख्या एका महिलेला मानसन्मान मिळेल, माझ्यावर एक चित्रपट निघेल आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, याची मी कल्पनाही केली नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे. माझ्यासाठी हे सगळं एका स्वप्नाप्रमाणं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लता कपे या मूळच्या बुलडाण्याच्या आहेत मात्र नंतर बारामतीतच त्यांनी त्यांचा जीवनप्रवास सुरू ठेवला.

अन् त्या अनवाणी धावल्या -

पती आजारी पडल्यावर एका मॅरेथॉनची जाहिरात वाचनात आल्यावर त्यातील बक्षीसाच्या रकमेने आपण पतीवर उपचार करु असे लता यांना वाटले. या पैशांसाठी त्या अक्षरशः अनवाणी आणि नऊवारी नेसून धावल्या. लताबाईंची दखल प्रसिध्दी माध्यमांनी घेतल्यानंतर रातोरात त्या स्टार बनल्या. त्यांची कहाणी ऐकून नवीन देशबोनाई यांनी त्यांच्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष बाब म्हणजे केवळ त्यांच्या जीवनावर चित्रपट आला नाही तर या सिनेमात त्यांनी स्वतःच भूमिकादेखील साकारली. अभिनयाची काहीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी हा सिनेमादेखील आपल्या जिद्दीनं पूर्ण केला. मात्र, आपल्या जीवनावरही चित्रपट येईल, त्यात आपल्यालाच भूमिका मिळेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसल्याचं सांगितलं. आपल्या जीवनाचील संघर्षाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, ही त्यांच्यासाठी नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Marathi cinema, Marathi entertainment, Mumbai, National film awards, Pune