मुंबई 15 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे फाउंडर ललित मोदी यांच्या डेटिंगच्या बातमीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सुष्मिताने सुद्धा आपल्या सोशल मिडीयावरून आता जाहीरपणे नात्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण काल रिलेशनशिपची (Lalit Modi Sushmita Sen dating) बातमी जाहीर करताना ललित मोदींनी घाईघाईत एक चूक केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांची ही चूक अजूनही सुधारली नसल्याचं सुद्धा दिसून येत आहे. असं काय केलं ललित मोदी यांनी? ललित मोदींनी काल संध्यकाळी ट्विटरवरून आपल्या आणि सुष्मिताच्या प्रेमसंबंधांची माहिती जाहीर केली. त्यांना ही बातमी जाहीर करायची इतकी घाई झाली असावी की अनावधानाने त्यांनी सुष्मिता सेनच्या पॅरडी अकाउंटला टॅग केल्याचं (lalit modi tweet mistake) दिसून आलं आहे. डेटिंग लाईफबद्दल खुलासा करताना भलत्याच सुष्मिता सेनच्या अकाउंटचं नाव त्यांनी टॅग केलेलं दिसून आलं. ट्विटमध्ये त्यांनी सुष्मिताला बेटर हाफ असं संबोधलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या जोर धरू लागल्या. त्यांनतर नव्या ट्विटमध्ये त्यांनी लग्न केलं नसल्याचं सुद्धा म्हटलं आहे. हे ही वाचा- Sushmita Sen Lalit Modi: ‘खूप झालं स्पष्टीकरण…’; डेटिंगच्या बातमींनंतर पहिल्यांदाच रिऍक्ट झाली सुष्मिता ते सध्या केवळ डेट करत आहेत पण एके दिवशी ते लग्न करतील असा विश्वास मोदी यांनी ट्विटमध्ये दिला आहे. पण त्यांनी ट्विटमध्ये टॅग केलेलं अकाउंट हे सुष्मिताचं खरं अकाउंट नसल्याचं समजत आहे. हे आहे पॅरडी अकाउंट
त्यांची ही चूक अजून तरी सुधारली नसल्याचं पाहायला मिळत आहे. काल आलेल्या या बातमीनंतर बॉलिवूड विश्वात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद्या टीनएज कपलने करावं तश्या क्युट हालचाली मोदी यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. डेटिंगच्या घोषणेनंतर ललित यांनी आपली इन्स्टाग्राम bio बदलून त्यात सुष्मिताच्या नावाचा उल्लेख केला आहे. “अखेर माझ्या partner in crime सोबत आयुष्याची सुरुवात करत आहे. My love सुष्मिता सेन” असं त्यांनी या bio मध्ये म्हटलं आहे.
Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families - not to mention my #better looking partner @sushmitasen47 - a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓. In love does not mean marriage YET. BUT ONE THAT For sure pic.twitter.com/WL8Hab3P6V
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
सुष्मिता नुकतीच या नात्याबद्दल रिऍक्ट झाली आहे आणि तिने सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत चाहत्यांना खूप प्रेम दिलं आहे. सुष्मिता आणि ललित दोघांचीही खाजगी आयुष्य अनेकदा चर्चेत राहिली आहेत. ललित यांचं पहिलं लग्न तर सुष्मिताचे तब्ब्ल दहा बॉयफ्रेंड याबद्दल बरीच चर्चा झाल्याचं समजत आहे.