जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shivani Baokar: 'लागीर झालं जी' च्या शीतलीला मिळाली नवी मालिका; 'झी मराठीवर पुन्हा घेणार दमदार एंट्री

Shivani Baokar: 'लागीर झालं जी' च्या शीतलीला मिळाली नवी मालिका; 'झी मराठीवर पुन्हा घेणार दमदार एंट्री

 शिवानी बावकर

शिवानी बावकर

‘लागीर झालं जी’ मालिकेतील शीतलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर देखील घराघरात लोकप्रिय झाली होती. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला छोट्या पडद्यावर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी: छोट्या पडद्यावरील काही मालिका आणि त्यातील भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘लागीर झालं जी’  ही मालिका. यातील आज्या आणि शीतलीची आगळीवेगळी लव्हस्टोरी प्रचंड गाजली होती. हे दोघे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या मालिकेतील शीतलीचा ‘लाखात एक माझा फौजी’ हा डायलॉग विशेष गाजला होता.  तसंच ही शीतलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर देखील घराघरात लोकप्रिय झाली होती. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला छोट्या पडद्यावर येत आहे. शिवानी झी मराठीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  झी मराठीवरील ‘लवंगी मिरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात शिवानी तिच्या साध्या भोळ्या बहिणीला छेडणाऱ्या दोन गावगुंडांना धडा शिकवताना दिसत आहे. तिचा तिखट अंदाज या मालिकेतून दिसणार आहे. नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत वाहिनीने लिहिलं, ‘लवंगी मिरचीच्या वाकड्यात गेलं तर झटका लागल्याशिवाय राहणार नाही.’  या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हेही वाचा - Sankarshan Karhade: प्रसाद ओकची संकर्षण कऱ्हाडेला कल्टी; पार्टीच्या नावाखाली करून घेणार ‘हे’ काम शिवनीच्या या नव्या मालिकेतील भूमिकेचं नाव अजून समोर आलं नसलं तरी प्रोमोवरून तिची ही भूमिका शीतली सारखीच बिनधास्त आणि ठसकेबाज अशी दिसत आहे. शिवानीने  ‘लागिरं झालं जी’ नंतर काही मालिका आणि चित्रपटातून काम केलं पण तिच्या या भूमिका रेक्षकांच्या मनावर खास छाप पाडू शकल्या नाही. त्यामुळे आता तिला पुन्हा त्याच ठसकेबाज, दमदार भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.  झी मराठीवरील ‘लवंगी मिरची’  ही मालिका १३ फेब्रुवारीपासून दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

जाहिरात

यापूर्वी स्टार प्रवाहवर दुपारीही मालिका दाखवण्यात येत होत्या. आता झी मराठीवरही दुपारी नव्या मालिका सुरू करण्यात येणार आहेत. आज मकर संक्रांतीच्या दिवशी झी मराठी वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. त्यात ‘यशोदा’ आणि लवंगी मिरची’ या मालिकांचा समावेश आहे. लवंगी मिरची मालिकेत शिवानी बावकर मुख्य भूमिकेत आहे.  तर दुसरी ‘यशोदा’ हा मालिका साने गुरुंजीच्या जीवनावर आधारित आहे.

News18लोकमत
News18लोकमत

झी मराठीनं टीआरपी मिळवण्यासाठी आता कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यात झी मराठीचा टीआरपी देखील वाढला होता. त्यामुळे आता आता झीच्या नव्या मालिकांचा वाहिनीला किती फायदा होणार हे लवकरच कळेल. या दोन्ही मालिका १३ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात