जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जिंकलस भावा! मराठमोळ्या अभिनेत्यानं गरजू शाळकरी मुलाला केली अशी मदत; पाहून भारावले चाहते

जिंकलस भावा! मराठमोळ्या अभिनेत्यानं गरजू शाळकरी मुलाला केली अशी मदत; पाहून भारावले चाहते

नितीश चव्हाण

नितीश चव्हाण

मराठमोळ्या अभिनेत्यानं एका शाळकरी गरजू मुलाला मदत करत सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. त्याच्या या सामाजिक कार्याने चाहते चांगलेच प्रभावित झाले आहेत. नक्की काय केलंय या अभिनेत्यानं जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 जुलै :   मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासोबतच अनेकदा समाजकार्य करताना देखील दिसतात. त्यांच्या चांगुलपणामुळे त्यांचे चाहते देखील प्रभावित होतात. आता सुद्धा असच काहीस घडलं आहे. एका मराठी अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. याचं कारण म्हणजे या अभिनेत्यानं एका शाळकरी गरजू मुलाला मदत करत सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. त्याच्या या सामाजिक कार्याने चाहते चांगलेच प्रभावित झाले आहेत. नक्की काय केलंय या अभिनेत्यानं जाणून घ्या. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘लागिर झालं जी’ आहे. एका सैनिकाच्या आयुष्यावर बेतलेली ही मालिका आणि त्यातील कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. या मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितिश चव्हाण सध्या चर्चेत आला आहे. हा अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. पण सध्या  इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओमुळे सध्या नितीशची चर्चा रंगली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनेता नितीश चव्हाणने एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तो एका शाळकरी मुलासोबत संवाद साधताना दिसत आहे. त्याला साताऱ्यात देवसागर ढाले नावाचा गरजू मुलगा भेटला. कोल्हापूरचा हा मुलगा केवळ नववीत शिकत असून घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे तो अगरबत्त्या विकण्याचं काम करतो.  साताऱ्यात हा मुलगा सुट्टीच्या दिवशी अगरबत्त्या विकण्यासाठी येतो. देवसागरला वडील नसल्यामुळे त्याची आई घरकाम करून मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावते आणि देवसागर अगरबत्त्या विकतो. नितीशला हा मुलगा भेटताच त्याने त्याची आपुलकीनं चौकशी केली. Vidya Balan: विद्या बालनवर आली होती 5 स्टार हॉटेलसमोर भीक मागायची वेळ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा एवढंच नाही तर नितीशने त्याच्याकडच्या सगळ्या अगरबत्त्या विकत घेत त्याला मदत केली. या मुलाला अभिनेत्याने ‘चांगलं शिक्षण घेण्याचा तसंच आईला नेहमी सांभाळण्याचा सल्ला देखील दिलाय. तसेच या व्हिडिओमध्ये नितीशने ‘तुम्हाला हा मुलगा कुठेही दिसला तरी याच्याकडून नक्की अगरबत्त्या विकत घ्या आणि त्याला मदत करा’ असं आवाहन त्याच्या चाहत्यांना आणि सातारकरांना केलं आहे.  या व्हिडीओला त्याने ‘चाल रं गड्या तू पुढ’असं कॅप्शन दिलं आहे. नितीशच्या या दिलदारपणावर चाहते भलतेच खुश झाले आहेत.

जाहिरात

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत असून नितिशचे चाहते त्याचे कौतुक करीत आहेत. एका चाहत्याने त्याच्या या व्हिडिओवर ‘सर तुम्ही सिरिअल मध्ये फौजी ची भूमिका केली ती तर एकदम नादखुलाच होती पण तो फौजी आज पण तुमच्या मध्ये आहे आणि कायम असाच राहील अशी आशा आहे . बोर्डर वर फक्त लढणं महत्त्वाच नसतं समाजात ही जनजागृती करणारी प्रत्येक व्यक्ती ही फौजी ची भूमिका पार पाडत असतो.’ अशी कमेंट केलीये तर दुसऱ्यांनी ‘म्हणून तर आम्ही नितीश दादाचे फॅन आहेत’, ‘जरी तुम्ही खरचे फौजी नसला तरी तुम्ही देशसेवा करत आहात …….खरंच सलाम तुम्हाला’ अशा कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात