जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vidya Balan: विद्या बालनवर आली होती 5 स्टार हॉटेलसमोर भीक मागायची वेळ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Vidya Balan: विद्या बालनवर आली होती 5 स्टार हॉटेलसमोर भीक मागायची वेळ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

विद्या बालन

विद्या बालन

विद्या बालन ‘नियत’ या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणारा आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने तिच्या आयुष्याविषयी असा खुलासा केलाय जो ऐकून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 जुलै :  विद्या बालन बॉलिवूडमधील तिच्या सशक्त आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सामान्य घरात जन्मलेल्या विद्याने छोट्या पडद्यावरून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिने आजवर अनेक एक सो एक चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. येणाऱ्या काळात विद्या बालन ‘नियत’ या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणारा आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने तिच्या आयुष्याविषयी असा खुलासा केलाय जो ऐकून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. Mashable ला दिलेल्या मुलाखतीत विद्याने सांगितले की, “मी IMG म्हणजेच इंडियन म्युझिक ग्रुप मध्ये काम करायचे. ते दरवर्षी शास्त्रीय संगीत मैफल, भारतीय शास्त्रीय संगीत मैफल आयोजित करायचे. ही मैफल तीन दिवस आणि रात्री चालायची. हा शो खूपच अप्रतिम असायचा. मी त्याच्या आयोजन समितीत काम करायचे. खरे तर मी स्वयंसेवक होते. कार्यक्रमाच्या आयोजनात आम्ही मदत करायचो आणि रात्री शो संपला की नरिमन पॉइंटवर फिरायला जायचो.’'

News18लोकमत
News18लोकमत

तिने पुढे सांगितलं की, ‘एकदा मला एका मित्रानं एक चॅलेंज दिलं. त्याने मला भर रात्री ओबेरॉय- द पाम्स या कॉफी शॉपचं  दार वाजवायला सांगितलं आणि काहीतरी खायला मागायला संगीतलं. मी एक अभिनेत्री होते हे त्यांना माहित नव्हतं. मी दार ठोठावत राहिले. सगळ्यांचीच चिडचिड होऊ लागली. मी खूप वेळा दार वाजवलं. मी म्हणाले, ‘प्लीज, मला भूक लागली आहे. कालपासून मी काही खाल्ले नाही. मला काहीतरी खायला द्या.’ माझी ऍक्टिंग पाहून सगळेच अवाक झाले पण सोबतच लाजले देखील. नंतर माझ्या मित्रानं मला बोलावलं. अशी ऍक्टिंग करून मी चॅलेंज जिंकले.’ असं विद्याने सांगितलं. Amruta Subhash: ‘तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नं अखेर…’ लस्ट स्टोरीज 2 फेम अभिनेत्रीसाठी अमृताची खास पोस्ट जिम जॅम बिस्किटावरील तिच्या प्रेमाचे वर्णन करताना विद्या म्हणाली, “ते चॅलेंज जिम जॅम बिस्किटसाठी होते. मैफिलीसाठी आमचा प्रायोजक ब्रिटानिया होता आणि त्यामुळेच आमच्याकडे भरपूर बिस्किटे होती. पण मी म्हणाले होते की मी चॅलेंज जिंकले तर मला जिम जॅमचे एक एक्स्ट्रा पॅकेट मिळेल आणि मी तसे केले.

जाहिरात

विद्याचा आगामी चित्रपट ‘नियात’ बद्दल बोलायचे झाले तर, याचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. यात विद्यासोबत राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपन्निता शर्मा आणि निक्की वालिया यांच्याही भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात