मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Laal Singh Chaddha: बॉयकॉटनंतर काय आहे चित्रपटाची अवस्था; समोर आलं आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Laal Singh Chaddha: बॉयकॉटनंतर काय आहे चित्रपटाची अवस्था; समोर आलं आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Laal Singh Chaddha movie

Laal Singh Chaddha movie

बॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 4 वर्षांनी पडद्यावर परतला आहे.

    मुंबई, 19 ऑगस्ट- बॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 4 वर्षांनी पडद्यावर परतला आहे.परंतु प्रेक्षकांकडून त्याला जो प्रेम आणि प्रतिसाद अपेक्षित होता त्याच्या अगदी विपरीत घडलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवा तसा कमाल दाखवू शकला नाही. समीक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. परंतु तरीसुद्धा प्रभावित झालेले लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले नाहीत.त्यामुळे बॉक्स ऑफिसवर काय परिणाम झालाय हे पाहावं लागेल. या चित्रपटाने गेल्या 7 दिवसात बॉक्स ऑफिसवर केलेल्या कलेक्शनचा आकडा पाहता, चित्रपटाबद्दल लोकांचा आकस स्पष्टपणे दिसून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर 7 दिवसात जवळपास 50 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवरचा ट्रेड पाहता हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यापर्यंत 53-54 कोटींची कमाई करेल असंच म्हणता येईल. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड मीडियावर सुरु होता. आमिर खानच्या या चित्रपटाच्या लाइफटाईम कमाईबाबत बोलायचं झालं तर तो 75 कोटींचा आकडा गाठू शकतो. या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे. आमिर खानच्या मागील काळातील देशाबद्दलच्या काही विधानामुळे लोक नाराज झाले होते. त्यांनी या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा निश्चय केला होता. तत्पूर्वी एका कार्यक्रमादरम्यान आमिरने मन दुखावल्याबद्दल लोकांची माफीही मागितली होती.परंतु तरीही लोकांनी हवा तास प्रतिसाद दिलेला नाहीय. (हे वाचा: Actress Tabu: बॉक्स ऑफिस कलेक्शनसंदर्भात तब्बूचं आश्चर्यकारक वक्तव्य, म्हणाली आपले पैसे....) 'लाल सिंग चड्ढा' ची तगडी स्टारकास्टदेखील प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी होऊ शकली नाही. या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंह यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटाद्वारे साऊथ अभिनेता नागा चैतन्यने बॉलिवूड. यामध्ये त्याने विशेष भूमिका साकारली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor

    पुढील बातम्या