मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Actress Tabu: बॉक्स ऑफिस कलेक्शनसंदर्भात तब्बूचं आश्चर्यकारक वक्तव्य, म्हणाली आपले पैसे....

Actress Tabu: बॉक्स ऑफिस कलेक्शनसंदर्भात तब्बूचं आश्चर्यकारक वक्तव्य, म्हणाली आपले पैसे....

tabu

tabu

सध्या बॉयकॉट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन यावर अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आपले मत मांडताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्री तब्बूनं बॉक्स ऑफिस कलेक्शनवर (Tabbu talk on box office collection) आश्चर्यचकित करणारं वक्तव्य केलं आहे.

  मुंबई, 18 ऑगस्ट : लॉकडाऊननंतर सिनेसृष्टीची अवस्था म्हणावी एवढी चांगली राहिली नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांची जादू फिकी पडत असल्याचं पहायला मिळतंय. अनेक चित्रपटांवर तर बॉयकॉटची मागणी होताना दिसतेय. त्यामुळे सध्या बॉयकॉट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन यावर अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आपले मत मांडताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्री तब्बूनं बॉक्स ऑफिस कलेक्शनवर (Tabu talk on box office collection) आश्चर्यचकित करणारं वक्तव्य केलं आहे. तब्बूने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बॉक्स ऑफिस कलेक्शनवर वक्तव्य केलेलं पहायला मिळालं. तब्बू म्हणाली की, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनशी माझा काहीही संबंध नाही. कारण या चित्रपटांमध्ये माझा पैसा गुंतलेला नसतो. त्यामुळे मला बॉक्स ऑफिस कलेक्शन नंबर्स गेमपासून दूर राहणे आवडते. याशिवाय, अभिनेत्री म्हणते की एखाद्याचे करिअर चित्रपट फ्लॉपमुळे संपत नाही. आपल्याला आपलं मानधन मिळतं. आपलं काम व्यवस्थित असलं आणि चित्रपट चांगला असला की बाकी बोलण्याची गरज नाही. हेही वाचा -  Janmashtami 2022: 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल परीचा क्युट VIDEO पाहिला का?, दिसतेय फारच गोंडस बॉक्स ऑफिस नंबरची चिंता करणे निर्मात्यांच्या हातात आहे. त्यामुळे या मी सगळ्याची जास्त चिंता करत नाही. तब्बूच्या या वक्तव्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तब्बूनं पुढे म्हटलं की, हे खरे आहे की जेव्हा तुमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतो तेव्हा खूप आनंद होतो. तब्बूनं मुलाखतीत सांगतिलेल्या तिच्या मताविषयी अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Tabu (@tabutiful)

  दरम्यान, तब्बूचा 'भूल भुलैया 2' नुकताच प्रदर्शित झाला, ज्याला लोकांचे खूप प्रेम मिळाले. तब्बूचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकचा गल्ला केला. 'भूल भुलैया 2' तब्बूच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. बॉलिवूडपेक्षा सध्या साऊथ चित्रपट जास्त कमाई करत आहेत. त्यामुळे सध्या बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु झाला आहे. बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडची जादू अधिक पसरत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे बॉलिवडकर काहीसे नाराज असल्याचं दिसत आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, South film

  पुढील बातम्या