• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेत्याला मुसळधार पावसाचा फटका; एका रात्रीत झालं 25 लाखांचं नुकसान

अभिनेत्याला मुसळधार पावसाचा फटका; एका रात्रीत झालं 25 लाखांचं नुकसान

पावसामुळे त्याच्या या रेस्तरॉची तीनतेरा वाजले आहेत. त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै: गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. (heavy rainfall) या पावसामुळे राज्यातील लोकांची जणू झोपच उडाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. या कोसळधार पावसाचा फटका अभिनेता कुशल टंडन (Kushal Tandon) याला देखील बसला आहे. अलिकडेच त्याने एका रेस्तरॉ सुरु केलं होतं. परंतु पावसामुळे त्याच्या या रेस्तरॉची तीनतेरा वाजले आहेत. त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. Raj Kundra नव्या अ‍ॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड; नाव ऐकून बसेल धक्का बिग बॉसमधून नावारुपास आलेला कुशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ आणि विविध प्रकारच्या पोस्टच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांच्या चर्चेत असतो. यावेळी त्याने पावसामुळे झालेल्या नुकसानाचे फोटो शेअर केले आहेत. “धन्यवाद, मुंबईच्या पावसा…माझ्या रेस्तरॉंची अशी अवस्था करण्यासाठी…यासाठी करोना कमी पडला होता ना…मग तू हे करून दाखवलंस…या कहाणीतील एक चांगली गोष्ट आहे की यात वॉचमनला आणि सिक्यूरिटी गार्डला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही…” अशी पोस्ट करत त्याने झालेल्या नुकसानाची माहिती दिली. राज कुंद्राचं नव्हे हे बॉलिवूड कलाकारही पॉर्नोग्राफी करून झाले कोट्यधीश कुशलची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या रेस्तरॉमध्ये पाणी साचलं. त्यामुळे फर्निचर आणि डेकोरेशन खराब झालं. सोबतच लाईट्सचं देखील मोठं नुकसान झालं आहे. कुशलनं गेल्याच वर्षी मोठ्या थाटामाटात हे रेस्तरॉ आणि बार सुरु केलं होतं. यासाठी त्याने विशेष पार्टी देखील दिली होती. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला, निया शर्मा, क्रिस्टल डिसूजा, सोहेल खान, रवि दुबे, करणवीर बोहरा, सरगुन मेहता, कृतिका सेंगर, निकितन धीर यांसारखे अनेक नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते. पावसामुळे त्याचं जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: