मुंबई 22 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. (Raj Kundra Pornograpgy case) राजला अटक झाल्यापासून गंदी बात फेम अभिनेत्री गहना वशिष्ट (Gehana Vasisth) देखील प्रचंड चर्चेत आहे. ती स्वत: देखील पॉर्न प्रकरणात अडकली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळात ती अनेक मोठे खुलासे करत आहे. दरम्यान राज कुंद्राच्या नव्या अॅपसंबंधी तिने धक्कादायक माहिती दिली. या अॅपसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला (Sai Tamhankar) देखील विचारण्यात आलं होतं असा दावा तिने केला आहे.
राज कुंद्राचं नव्हे हे बॉलिवूड कलाकारही पॉर्नोग्राफी करून झाले कोट्यधीश
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गहनाने राज पॉर्नोग्राफी प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “राज कुंद्राला अटक होण्याच्या काही दिवसांपूर्वीच आमची त्याच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती. त्यावेळीच मला त्याच्या नवीन 'बॉलिफेम' या अॅप बद्दल समजलं होतं. या अॅपवर चॅट शो तसंच रिअॅलिटी शो, फिचर फिल्म, म्युझिकल व्हिडिओंचा समावेश असणार होता. याबद्दल आमचं बोलणं झालं होतं. त्यात कोणताही अश्लील किंवा बोल्ड मजकूर नसणार होता. असंही गहनानं स्पष्ट केलं आहे. या अॅपवरील एका चित्रपटासाठी त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तर आणखी एका चित्रपटासाठी सई ताम्हणकरला विचारण्यात आलं होतं.”
राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
यापूर्वी असेच काहीसे खुलासे अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने देखील केले होते. “राज कुंद्रा प्रकरणात सर्वात पहिली जबानी मिच दिली होती. अनेक पत्रकार गेली काही दिवस मला राज कुंद्रा प्रकरणावर काही तरी बोल असं म्हणत होतं. मात्र मार्चमध्ये मी सर्वप्रथम माझा जबाब नोंदवला होता. ज्यावेळी मार्चमध्ये तपासाची नोटीस आली होती. तेव्हा मी ना देश सोडून गेले, ना कुठे गायब झाले, ना भूमिगत झाले.” अशी प्रतिक्रिया तिने एका व्हिडीओद्वारे दिली होती. शिवाय तिने राजवर आर्थिक फसवणूकीचे आरोप देखील केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Porn star, Raj kundra, Shilpa shetty