Home /News /entertainment /

तुम्हालाही करायला आवडेल; भाऊ-कुशलने दाखवलं भन्नाट योगासन

तुम्हालाही करायला आवडेल; भाऊ-कुशलने दाखवलं भन्नाट योगासन

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) ची टीम एकमेकांची चेष्टा करायची एक संधी सोडत नाहीत. सध्या याचा प्रत्यय सर्वाना कुशल बद्रिकेच्या (Kushal Badrike) नव्या पोस्टमधून येत आहे.

  मुंबई 21 जून: चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या झी मराठीवरील (Zee Marathi) प्रसिद्ध कार्यक्रमाने सुमारे आठ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवलं आहे आणि आजही अविरतपणे हसवण्याचं काम करत आहे. हवा येऊ द्या चा चमू हा एवढा तगडा आहे की त्यांना तोड नाहीये हेच सगळ्यांचं मत आहे. या चमूतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे (Kushal Badrike) कुशल बद्रिके. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने त्याने एक खास आसन शेअर केलं जे पाहून प्रेक्षक चक्रावले आहेत. आता तर योगा दिवास संपला आता आसन करून काय उपयोग असं जर वाटत असेल हे असं तुम्ही कुठे आणि कधीही करू शकता असं स्वतः कुशल सुद्धा सांगतो आहे. स्नेहल शिदंम (Snehal Shidam) या खास कॅमेरामॅन सह कुशल बद्रिकेने खास रिपोर्टींग करत एका अभिनेत्याची पोलखोल केली आहे. यासंबंधी त्याने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला असून त्यात तो असं म्हणतो, “नमस्कार आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त हवा येऊ द्या च्या सेटवर सुद्धा उत्सहाने या दिवसाचं सेलिब्रेशन होत आहे. योगामधील मेडिटेशन म्हणजे ध्यान करायचं जे महत्त्वाचं आसन आहे ते तुम्ही आत्ता पाहू शकता. या आसनाला ‘ढाराढूरासन’ असं म्हणलं आहे. आणि हे तुम्ही कधीही कुठेही करू शकता.” असं म्हणत कॅमेरा फिरतो आणि अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam) झोपलेले दिसत आहे. या कमाल कॉमेडी व्हिडिओने सध्या धुमाकूळ घातल्याचं सुद्धा समोर येत आहे. योगा डे (International Yoga Day) च्या निमित्ताने भाऊ कदम यांच्या भन्नाट आसनाची पोलखोल कुशलने एका इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून केली आहे. योगा डे च्या निमित्ताने जिथे अनेक कलाकार कटाक्षाने आसन करताना दिसत होते, आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असताना दिसत होते तिथे भाऊ कदम यांनी केलेलं हे आसन पाहून अनेकजण लोटपोट झाले आहेत.
  कुशल यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हवा येऊ द्या ची टीम कायमच एकमेकांची चेष्टा मस्करी करताना दिसते. हे ही वाचा- Devmanus serial: 'तांबडे बाबा' ते 'कमनी कमनी' अभिनेते मिलिंद शिंदेंची खतरनाक स्टाईल प्रेक्षकांमध्ये हिट
   कधी श्रेया कुशलचे गमतीने पाय ओढताना तर कधी कुशल भाऊंची मस्करी करताना दिसत असतात. त्यांच्या या कँडिड मोमेंट्स ते कायमच शेअर करत असतात. कधीकधी हे कलाकार चालू स्किटमध्ये सुद्धा एकमेकांची चेष्टा करायची संधी सोडत नाहीत. विशेषतः कुशलचा मिश्किल स्वाभाहव तर तो कायमच त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करताना दिसतो.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Zee Marathi

  पुढील बातम्या