मुंबई 21 जून: झी मराठीवरील (Zee Marathi) मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus marathi serial) सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेचा पहिला भाग एवढा लोकप्रिय झाला की त्याचा दुसरा भाग आला आणि त्याला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातील एक महत्त्वाची पोलिसांची भूमिका साकरणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या एका व्हिडिओची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहेत. मिलिंद शिंदे (Milind Shinde) हे नाव प्रेक्षकांसाठी नवं नाही. याआधी सुद्धा त्यांना अनेकांनी झी मराठीवरील ‘तू तिथे मी’ मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत पाहिलं आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी तयार केलेल्या एका गाण्याची जबरदस्त चर्चा झाली होती. ‘तुम्हारी शरण में तांबडे बाबा, मेरे बाबा तांबडे बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा’ असं एक धमाल गाणं ते दरवेळी मालिकेत गायचे. या भूमिकेने त्यांना एक वेगळी ओळख दिली.
सध्या त्यांच्या देवमाणूस मालिकेतील भूमिकेची सुद्धा बरीच चर्चा होताना दिसते. या मालिकेत सुद्धा त्यांनी एक नाव गाणं तयार केल्याचं समोर येत आहे. ‘कमनी कमनी’ असं या गाण्याचं नाव आहे. हे ही वाचा- VIDEO: ललितचं लग्न जमता जमता राहिलं! मुलीनं केलं असं काही की उडाली अभिनेत्याची झोप
झी मराठीच्या सोशल मीडियावरून या गाण्याचं खास रील शेअर केलं आहे. यात मिलिंद शिंदे हे नवं गाणं गाताना दिसत आहे. त्यांच्या कमाल आवाजात गाणं गात त्यांनी धमाल उडवून दिली आहे. कमनी कमनी ओये ओये असं म्हणत ते सगळ्यांची झोप उडवणाऱ्या अशा सुश्राव्य आवाजात गाणं गाताना दिसत आहेत. मिलिंद शिंदे हे कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुश करत आले आहेत. त्यांची भीतीदायक वाटणारी भूमिका सुद्धा कधीतरी अशी हसवून जाते. ते साकारत असलेलं पात्र इन्स्पेक्टर जामकर हे मालिकेला एका वेगळ्याच वळणावर नेताना दिसत आहे. या इन्स्पेक्टर कडून तरी देवमाणसाचा पर्दाफाश होणार का याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.