जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: अरुंधती देणार संजनाला देशमुखांचा पिढीजात हार; मंगळागौरीसाठी कुटुंब येणार एकत्र

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती देणार संजनाला देशमुखांचा पिढीजात हार; मंगळागौरीसाठी कुटुंब येणार एकत्र

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती देणार संजनाला देशमुखांचा पिढीजात हार; मंगळागौरीसाठी कुटुंब येणार एकत्र

आई कुठे काय करते मालिकेत प्रेक्षकांना मंगळागौरी विशेष भाग प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 ऑगस्ट:  श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण म्हणजे स्त्री वर्गाचा नटण्या मुरडण्याचा खास महिना असतो. अनेक सण श्रावणात येतात. त्यात श्रावणातील मंगळागौरी तर खास असते. टेलिव्हिजनच्या नायिका देखील मंगळागौरी साजरी करता दिसणार आहेत. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेत अनघा आणि संजना यांची पहिली मंगळागौरी साजरी होणार आहे. मंगळागौरी विशेष भाग प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. या निमित्तानं संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येणार आहे. गेली अनेक दिवस  देशमुखांच्या घरी सुरू असलेल्या वाईट प्रसंगानंतर सगळं काही सुरुळीत होताना दिसणार आहे. आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण आज पाहणार आहोत की, अनघा आणि संजना त्यांची पहिली मंगळागौरी साजरी करणार आहेत. कांचन सगळ्यांना अनघा आणि संजनाची पहिली मंगळागौरी साजरी करायची आहे असं सांगते. त्यानुसार घरी पूजेची तयारी केली जाते. इकडे संजना आणि अनघा तयार होतात. तितक्यात अरुंधती संजनाला देशमुखांच्या घरातील पारंपारिक पिढीजात दागिना संजनाकडे सुपूर्त करते. मात्र हा दागिना संजनाच्या गळ्यात पाहून कांचन मात्र अरुंधतीवर रागावते. कांचन संजनाला तो दागिना घालू देणार का? की आजच्या आनंदाच्या क्षणावर मिठाचा खडा पडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. हेही वाचा - Tu Tevha Tashi : स्वप्निल जोशीनं सांगितलं अभिज्ञा भावेचं ‘ते’ गुपित

जाहिरात

मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र आलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. संजना, अनघा, गौरी, इशा सह अरुंधती आणि कांचन देखील सुंदर नटल्या आहेत. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सध्या सगळं आलेबेल असल्याचं पाहायला मिळत आहे. यश जेलमधून सुखरुप बाहेर आल्यानंतरही घरातील सर्व नाराज होते. यशला आनंदात ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात. अभि मात्र या सगळ्यावर नाराज होता. यशच्या वाढदिवसादिवशी यश घर सोडून गेल्यानं सगळेचं टेन्शनमध्ये आले होते. अनघा देखील मी घर सोडून जाणार या निर्णयावर ठाम होती. परंतू अभिला त्याची चूक लक्षात आली आणि तो घरी आला. त्याच्या परत येण्यानं देशमुखांच्या घरातील आनंद परत आला. अशातच आता अनघा आणि संजनाची यांची पहिली मंगळागौर साजरी देशमुखांच्या घरात साजरी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात