नवी दिल्ली, 6 मे : पंतप्रधान मोदींचा (PM narendra Modi) तीन दिवसांचा युरोप दौरा संपला आहे. पंतप्रधानांच्या या भेटीबाबत उपस्थित भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह होता. या दौऱ्यादरम्यान अशा अनेक घटना घडल्या ज्या माध्यमांच्या मथळ्यात आल्या. बर्लिनमध्ये (berlin) एका मुलीने पंतप्रधानांना स्वत:च्या हाताने रेखाटलेला फोटो दाखवला, त्यावर मोदींनी मुलीचं कौतुक केलं आणि ऑटोग्राफ दिला. यासोबतच एका मुलाने पंतप्रधान मोदींना देशभक्तीपर गीतही सुनावले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर (viral video of pm narendra modi) केला जात आहे. पण याच दरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने या व्हिडिओची संपादित आवृत्ती त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. वास्तविक कुणाल कामराने पंतप्रधानांचा मुलासोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण, कामराने ते गाणं बदललं. मुलाने गायलं आहे, ‘हे जन्मभूमी भारत’ जे कामराने 2010 च्या ‘पीपली लाइव्ह’ चित्रपटातील ‘महंगाई डायन खाये जात है’ ने बदलले. त्यानंतर आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या ट्विट वरुन कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. कामरा याच्या ट्विटवर आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की त्यांनी तक्रारीची दखल घेतली आहे. राजकीय विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणे हे बाल न्याय कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता कामरा यांच्या अडचणी वाढू शकतात. ‘सगळीकडे रक्ताचा सडा..’,मलायकाने सांगितली अंगावर काटा आणणारी त्या रात्रीची कहाणी मुलाच्या वडिलांकडून कामराला उत्तर मुलाच्या वडिलांनी कुणाल कामराच्या व्हिडिओवरच पोस्ट लिहिली आहे. गणेश पॉल नावाच्या ट्विटर हँडलने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, मला एक 7 वर्षांचा मुलगा आहे, त्याला आपल्या प्रिय मातृभूमीसाठी गाण्याची इच्छा होती. तो अजून लहान असला तरी, त्याला त्याच्या देशावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे मिस्टर कामरा किंवा कचरा, तुम्ही काहीही असाल.’ त्यांनी पुढे लिहिले की, ‘निरागस मुलाला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवा आणि तुमच्या वाईट विनोदांवर काम करण्याचा प्रयत्न करा.’ देशभक्तीपर गाणे ऐकून पंतप्रधान मोदी थक्क तीन देशांच्या युरोप दौर्याच्या पहिल्या टप्प्यावर पंतप्रधान सोमवारी बर्लिन येथे पोहोचले आणि येथील डायस्पोरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. हॉटेल अॅडलॉन केम्पिंस्की येथे समाजातील इतरांसह पंतप्रधानांची वाट पाहणाऱ्या मुलांमध्ये आशुतोष आणि मान्या मिश्रा यांचा समावेश होता. आशुतोषने पंतप्रधान मोदींसाठी देशभक्तीपर गीत गायले आणि मोदींनी मुलाच्या प्रतिभेचे कौतुक केले आणि “शाबास” असे म्हटले. फॅमिली फंक्शन एन्जॉय करताना दिसली भाग्यश्री लिमये,भाच्यासोबतचे क्युट फोटो VIRAL कुणाल कामरा काय म्हणाले? मुलाच्या वडिलांचा आक्षेप आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर कुणाल कामराने आपले ट्विट डिलीट केले. कुणालने ट्विटवर मुलाच्या वडिलांना उत्तर दिले, “एका वृत्तसंस्थेने जारी केलेला हा व्हिडिओ सार्वजनिक व्यासपीठावर आहे. हा विनोद तुमच्या मुलाबद्दल नाही. आपल्या मुलाने देशाच्या सर्वात लोकप्रिय सुपुत्रासमोर मातृभूमीसाठी गाणे गायले तर त्याचा आनंद घ्या, परंतु, अशी अनेक गाणी आहेत जी त्यांनी आपल्या देशातील लोकांकडून ऐकली पाहिजेत. अशाच एका ट्विटवर कुणाल कामराने प्रतिक्रिया दिली, “जेव्हा सर्वत्र कॅमेरे होते, तेव्हा मुलाच्या वडिलांनी मुलाला पंतप्रधानांसमोर गाणे म्हणायला नेले. हे फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. मी नाही तर पंतप्रधानांनी मुलाला सार्वजनिक व्यासपीठावर आणले आहे. मी फक्त गाणं मुलाच्या माध्यमातून पंतप्रधानांना सुनावलं, जे त्यांनी खरोखर ऐकायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.