हिमेश रेशमियानंतर बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकानं दिली रानू यांना गाण्याची ऑफर

हिमेश रेशमियानंतर बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकानं दिली रानू यांना गाण्याची ऑफर

रानू यांच्या बॉलिवूड डेब्यूनंतर आता अनेकजण त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर व्हायरल सिंगर रानू मंडल यांच्या नावाचीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं 'तेरी मेरी कहानी' हे पहिलं गाणं रिलीज झालं. या गाण्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्युझिक कंपोझर आणि सिंगर हिमेश रेशमियानं रानू यांना पहिली संधी दिली. त्याच्या 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या सिनेमातील 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रानू यांच्या आवजात रेकॉर्ड झालं. रानू यांच्या बॉलिवूड डेब्यूनंतर आता अनेकजण त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. यात आता बॉलिवूड सिंगर कुमार सानू यांचाही समावेश झाला आहे.

IIFA Award : दीपिका, रणवीर, आलियासह ग्रीन कार्पेटवर दिसला बॉलिवूडकरांचा Swag

प्रसिद्ध सिंगर कुमार सानू यांनी नुकतंच एका कार्यक्रमात रानू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांच्याच एका म्युझिक अल्बम लॉन्चच्या कार्यक्रमात त्यांना रानू यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी कुमार सानू यांनी रानू मंडल यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'जर कोणी नवा गायक या इंडस्ट्रीमध्ये येत असेल तर आम्हाला आनंदच वाटतो. रानू खूपच चांगलं काम करतील तर त्यांना चांगली ओळख मिळेल. जर मला त्याच्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव मिळाला तर मी नक्कीच त्यांच्यासोबत काम करेन. हिमेशनं त्यांना त्याच्या सिनेमासाठी काम करण्याची संधी दिल्याचं मी ऐकलं आहे. मात्र त्यांचं गाणं अद्याप ऐकलेलं नाही. येणाऱ्या काळात त्या कसं काम करतात ते पाहूयात.'

VIDEO : अनुष्का शर्माला लागलीय विचित्र सवय, शूटिंग सुरू असताना करते 'हे' काम

रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक 'आदत' नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'आदत'नंतर रानू मंडल हिमेशसोबत 'आशिकी में तेरी...' साठी सुद्धा काम करणार आहे.

आपल्या जादुई आवाजानं सर्वांना वेड लावणाऱ्या रानू मूळच्या पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणाऱ्या आहेत.रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू गात असेलेलं लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला.

'सुपरस्टार सिंगर'च्या स्पर्धकांनाही रानू मंडल यांच्या आवाजाची भुरळ, पाहा VIDEO

त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यांनी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

========================================================

बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

First published: September 19, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading