मुंबई 26 जून: अभिनेता, समिक्षक कमाल आर. खान (KRK) आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. कोर्टानं केआरकेला सलमान विरोधात कुठलीही पोस्ट शेअर करण्यास मानाई केली आहे. परिणामी या वादात त्यानं एक पाऊल मागे घेत सलमानची माफी मागितली आहे. तू सांग कुठले व्हिडीओ डिलिट करु? हा उलट प्रश्न त्यानं सलमानला विचारला आहे. (KRK review on Salman Khan)
“प्रिय मित्रा सलमान खान, मी तुझ्यावरील सर्व व्हिडीओ डिलिट केले आहेत. तुझ्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी तुझ्याविरुद्धची लढाई कोर्टात सुरू ठेवेन. यापुढे कोर्टाच्या परवानगीशिवाय मी तुझ्या चित्रपटांचा रिव्ह्यू करणार नाही. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. जर एखादा व्हिडीओ डिलिट करायचा राहिला असेल तर मला सांग मी तो काढून टाकेन.” अशा आशयाचे दोन ट्विट्स करत कमाल खाननं सलमानसमोर तात्पूरती माघार घेतली आहे. परंतु केआरकेनं खरंच माघार घेतली आहे की हा नुसता दिखावा करतोय असा प्रश्न त्याचे ट्विट्स पाहून नेटकऱ्यांना पडला आहे.
‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप
Your team can notify me if I have left any video on my channel which offends you, so that I can delete that video also.
— KRK (@kamaalrkhan) June 25, 2021
‘मला बॉलिवूडमध्ये कामच करायचं नाहिये’; रिताभरीनं का नाकारल्या कोट्यवधींच्या ऑफर?
प्रकरण काय आहे?
सलमान खाननं एकूण 9 जणांविरोधात मानहानिचा दावा ठोकला होता. या 9 जणांमध्ये केआरकेचा देखील सामावेश आहे. ही मंडळी सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्यावर वारंवार टीका करत होते. त्यांची ही वक्तव्य रोखली जावी यासाठी सलमाननं कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. हे प्रकरण केआरकेनं राधे चित्रपटावर केलेल्या रिव्ह्यूमुळं आणखी पेटलं. सध्या कोर्टानं सलमानविरोधात कुठलंही खासगी वक्तव्य करण्यास केआरकेला मनाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Movie review, Salman khan