• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप

‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप

पायल रोहतगीला पोलिसांनी खोट्या केसमध्ये अडकवलं? संग्राम सिंगनं केला लाच घेतल्याचा आरोप

 • Share this:
  मुंबई 26 जून: वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीला (Payal Rohatgi) अटक करण्यात आली आहे. शेजाऱ्यांना आणि सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलांना तिनं हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. मात्र या कारवाईवर पायलचा मित्र संग्राम सिंग (Sangram Singh) यानं नाराजी व्यक्त केली आहे. (Payal Rohatgi arrested by Police) पोलिसांना पैसे देऊन तिला खोट्या केसमध्ये अटकवल्याचे आरोप त्यानं केले आहेत. संग्राम हा एक प्रसिद्ध एथलीट आहे. तो पायलचा खूप चांगला मित्र देखील आहे. अटकेची बातमी मिळताच तिला भेटण्यासाठी तो अहमदाबादमध्ये आला. इथे आल्यानंतर वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यानं पायल निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला, “सोसायटीचे लोक आणि पोलीस मिळून पायलला खोट्या प्रकरणात अडकवत आहेत. ती अत्यंत शांत प्रवृत्तीची व्यक्ती आहे. पोलिसांनी पैसे घेऊन तिच्याविरोधात केस दाखल केली आहे. या प्रकरणातील खोटेपणा लवकरच सिद्ध होईल.” तसेच पायलला लवकरात लवकर जामिन मिळावा यासाठी त्यानं कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत. ‘मराठी अभिनेत्रींना किस करणं शोभत का?’ ट्रोलर्सला तेजस्विनी पंडितचं जोरदार प्रत्युत्तर ‘मी सिंगल नाही, माझ्यावर लाईन मारू नका’; ट्रोलर्सला अभिनेत्रीची विनंती यापूर्वी राजस्थान पोलिसांनी देखील पायलला अटक केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलनं तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं नेहरुंवर खोटे आरोप केले होते. या प्रकरणातून अद्याप तिची पूर्णत: सुटका झालेली नाही. दरम्यान आता तिनं आणखी एक वाद अंगावर ओढून घेतला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: