ती म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीस मी मिळतील त्या भूमिका साकारल्या. त्यापैकी जवळपास सर्वच भूमिका एकसारख्याच होत्या. केवळ त्यांची नावं वेगवेगळी होती. परंतु आता मी पठडीबाज अन् नायकाच्या मागे केवळ उभं राहणाऱ्या भूमिका नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. अन् बॉलिवूडमधून देखील मला अशाच भूमिका मिळत होत्या त्यामुळं मी नकार दिला.”