जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kranti Redkar: 'तू ये आमच्याकडे तुला ट्रॅफिक काय असतं दाखवते'; क्रांतीचा धमाल video पाहा

Kranti Redkar: 'तू ये आमच्याकडे तुला ट्रॅफिक काय असतं दाखवते'; क्रांतीचा धमाल video पाहा

Kranti Redkar: 'तू ये आमच्याकडे तुला ट्रॅफिक काय असतं दाखवते'; क्रांतीचा धमाल video पाहा

इन्स्टाग्रामवर कायमच आपल्या अंदाजाने चाहत्यांना खुश करणारी क्रांती (Kranti Redkar Wankhede) एका नव्या व्हिडिओमधून भन्नाट गोष्ट सांगत आहे. काय आहे ही गोष्ट?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 8 जुलै: अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) सध्या अभिनयासोबत दिग्दर्शनात सुद्धा पाऊल ठेवलं आहे. काकण सिनेमानंतर ही अभिनेत्री ‘रेनबो’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने क्रांती काही काळापूर्वी लंडनमध्ये शूटिंग करत होती. लंडनमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत घडलेला एक भन्नाट किस्सा तिने शेअर केला आहे. क्रांती सोशल मीडियावर (Kranti Redkar instagram reels) बरीच ऍक्टिव्ह असते. तिचे रील्स बघायला अनेक चाहते उत्सुक असतात. प्रत्येकाला अगदी आपलेसे वाटतील असे विषय ती रील्समधून शेअर करत असते. सध्या तिने लंडनमध्ये घडलेला एक किस्सा शेअर करत नवीन रील पोस्ट केलं आहे. क्रांती लंडनमध्ये तिच्या एका मैत्रिणीला भेटली होती आणि शूटिंगमधून वेळ काढत त्यांनी बाहेर फिरायला जायचा बेत आखला होता. लंडनमध्ये गाडी चालवताना तिची मैत्रीण असलेल्या ट्रॅफिकबद्दल सारखी तक्रार करत होती. त्यावर क्रांती असं म्हणाली, “आमच्या आजूबाजूला मोजून चार गाड्या होत्या. काहीच ट्रॅफिक नव्हतं. तसंच वीक डे होता आणि भर पीक आवर मध्ये एवढं ट्रॅफिक होतं. मी तिला म्हणाले की तुला ट्रॅफिक बघायचं असेल ना तर आमच्याकडे ये. ये कधी जुहू सर्कलला. आमच्याकडे फक्त एकावर गाडी चढवू शकत नाही म्हणून नाहीतर लोकांनी ते ही केलं असतं.” अशा शब्दात आणि तिच्या भन्नाट अंदाजात क्रांती या रीलमध्ये मजा आणताना दिसत आहे. ट्रॅफिकची अशी विनोदी पद्धतीत मांडलेली शोकांतिका चाहत्यांना फारच आवडल्याचं दिसून येत आहे. काही कलाकारांनी सुद्धा वेगवेगळ्या जगणावर किती ट्रॅफिक होतं असं कमेंट करून या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हे ही वाचा-  Sai Lokur: काय ते ठुमके, काय तो बाज; सई लोकूरचा नऊवारी साडीत मराठमोळा साज! तसंच तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ”अरे ट्रॅफिक काय असतं आम्हाला विचार. आणि माझं माझ्या देशावर, राज्यावर, शहरावर खूप प्रेम आहे नाहीतर त्यावरून काही लोक प्रवचन द्यायला सुरु करतील.” तिने शेवटी दिलेल्या या टीपमुळे सुद्धा अनेकांनी तिचं कौतुक केल्याचं कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.

जाहिरात

मुंबईत गेल्या काही वर्षांत ट्रॅफिकचं प्रमाण भयंकर वाढल्याचं दिसून आलं आहे. अनेकांना कित्येक तास ट्रॅफिकमध्ये अडकावं लागल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. फक्त मुंबईच नाही तर अनेक शहरांमध्ये हीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतं. यावरच आधारित एक किस्सा क्रांतीने शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात