मुंबई, 22 जून : मनोरंजन क्षेत्रात मागील काही काळापासून कलाकरांच्या अकाली एक्झिट होत आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या राहत्या घरात तो मृतावस्थेत सापडला. त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या गायक आहे दक्षिण कोरियामधली. चोई सुंग बोंग असं मृत्यू झालेल्या दक्षिण कोरियन गायकाचं नाव आहे. वयाच्या 33 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय. मंगळवारी सकाळी 9.41मिनिटांनी पॉप मूर्ती दक्षिण कोरियातील सियोल येथे त्याच्या राहत्या घरात त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गायकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक चोई सुंग बोंग मागील काही काळापासून त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत होता. त्याला कॅन्सर झाल्याचा दावा त्याने केला होता. पण नंतर खोट बोलत असल्याचं समोर आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, चोंग सुंग बोंगने त्याच्या मृत्यूच्याआधी त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक मेसेज पोस्ट केला होता. ती पोस्ट पाहता गायकानं आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जातोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हेही वाचा - Honey Singh Gets Threat: सलमान खान नंतर हनी सिंगला व्हाईस नोटच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी ! गायक चोई सुंग बोंग याने त्याच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगाचा समाना केला होता. आर्थिक अडचणी असल्याने त्याने म्युझिक स्कूलला जाणं सोडलं होतं. काम करून तो त्याचं पोट भरत होता. गायक चोई सुंग बोंग 2011मध्ये टीवीएन ऑडिशन कार्यक्रम कोरियाज गॉट टॅलेंटमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून तो प्रसिद्ध झाला. तिथे त्याच्या गाण्यानं त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. जस्टिन बीबरनं देखील त्याचं गाणं ऐकलं होतं. जस्टिन बीबरनं त्यांचं प्रचंड कौतुक केलं होतं.
एका मुलाखतीत गायक चोई सुंग बोंगने म्हटलं होतं की, लहानपणी अनाथाश्रमातून पळून गेल्यानंतर त्याचं आयुष्य फार कठीण होतं. आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. आयुष्यात अनेक गोष्टीचा सामना केल्यानंतही तो त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होता. मात्र त्याच्या अचानक निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.