जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Honey Singh Gets Threat: सलमान खान नंतर हनी सिंगला व्हाईस नोटच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी !

Honey Singh Gets Threat: सलमान खान नंतर हनी सिंगला व्हाईस नोटच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी !

हनी सिंगला व्हाईस नोटच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी

हनी सिंगला व्हाईस नोटच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी

Honey Singh Gets Threat: प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगला कॅनडात असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार या गँगस्टरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 जून- प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगला कॅनडात असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार या गँगस्टरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हनी सिंगच्या कार्यालयाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल कडे तक्रार देण्यात आली आहे. त्याला ही धमकी व्हाईस नोटच्या माध्यामातुन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दिल्ली पोलिस या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करत आहेत.  यापूर्वी अभिनेता सलमान खान याला देखील जिवे मारण्याची धमकी आली होती. धमकीची व्हॉईस नोट मिळाल्यानंतर हनी सिंगने दिल्ली पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर स्पेशल सेलचे स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल यांचीही भेट घेतली. मिडिया रिपोर्टनुसार, हनी सिंगने कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रार यानेच हा व्हॉईस नोट पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्याने ती व्हॉईस नोटही पोलिसांना दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गोल्डी ब्रारने दिली होती मुसेवालाच्या हत्येची कबुली 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे ब्रारने मुसेवालाच्या हत्येची कबुली दिली होती. तो म्हणाला  होता की, लॉरेन्सचा महाविद्यालयीन मित्र विकी मिड्दुखेडाच्या हत्येत मुसेवालाचा हात होता. मुसेवालाचा व्यवस्थापक शरणदीपने शूटर्सना आश्रय देऊन टार्गेटची माहिती दिली. पोलिसांनी मुसेवालावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे नाईलाजाने त्याची हत्या करावी लागली. मानसाच्या जवाहरके गावात मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात