जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल

जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल

कपूर सिस्टर्स जान्हवी आणि खुशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर कोणालाच हसू आवरणार नाही.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडेच हाहाकार माजला आहे. ज्यामुळे बॉलिवूडकर सुद्धा सर्व सिनेमांचं शूटिंग थांबवून घरीच बसले आहेत. अशात जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सर्वांना घरी राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. अशा कपूर सिस्टर्स जान्हवी आणि खुशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल.

जान्हवी कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोन्ही बहिणी घरात क्वॉरेंटाइनचा काळ कसा घालवत आहेत हे पाहयला मिळात आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूरनं खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग केलेलं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर त्यांच्या काही मैत्रिणी खुशीला हसत तिचा व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये खुशी नुडल्स खाताना दिसत आहे.

श्रीदेवींची 'लेक' अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा ग्रँड वेडिंगचे UNSEEN फोटो

जान्हवीनं बॉलिवूड डेब्यू केला असला तरीही तिची बहीण खुशी मात्र बॉलिवूडपासून दूर आहे. सध्या खुशी न्यूयॉर्कमध्ये तिचं ग्रॅज्यूएशन पूर्ण करत आहे. मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं हेल्थ इमरजन्सी लागू केल्यानंतर ती मुंबईला परतली आहे. कोरोनामुळे सध्या जवळजवळ सर्वच स्टार कलाकार घरी बसून आहेत. ज्यात कपूर सिस्टर्स अशाप्रकारे एन्जॉय करताना दिसत आहेत.

Coronavirus वर कार्तिकचा Breathless डायलॉग, 2 मिनिटं 24 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल

Coronavirus चा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला, शेअर केला एअरपोर्टवरील अनुभव

First published: March 20, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या