मुंबई, 20 मार्च : बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. देशभरातील सर्वच सेलिब्रेटी घरी राहण्याची विनंती त्यांच्या चाहत्यांना करत आहे. हॉलिवूडच्या काही कलाकरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी आहे. कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती आणि सूत्रांच्या माहितीनुसार तिला कोरोना झाल्याची माहिती तिनं काही दिवस सर्वांपासून लपवून ठेवली होती. असंही म्हटलं जात आहे की काही दिवसांपूर्वी लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकानं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वर्तुळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते. जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरुन हसाल
कनिकानं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन शेअर केली आहे.कनिकानं लिहिलं, ‘मागच्या 4 दिवसांपासून मला तापाची लक्षण दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट करुन घेतली आणि माझी COVID-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे.’ शिल्पा शेट्टीनं आता केली अभिनेता राजपाल यादवची धुलाई, पाहा VIDEO कनिकानं पुढे लिहिलं, ‘मागच्या काही दिवसांपासून मी ज्या ज्या लोकांना भेटले त्या सर्वांची टेस्ट केली जाणार आहे. 10 दिवसापूर्वी मी घरी आले त्यावेळी माझी एअरपोर्टवर सामान्य पद्धतीनं तपासणी करण्यात आली होती. पण मला 4 दिवसांपूर्वीच या व्हायरसची लक्षणं दिसू लागली. सध्या तरी मी सर्वांना एवढंच सांगेन गर्दीत जाणं टाळा, घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. अशी कोणत्याही प्रकारची लक्षण दिसल्यास लगेचच स्वतःची टेस्ट करून घ्या.’
A prominent Bollywood singer is among the four people who have been tested positive for #Coronavirus in Uttar Pradesh today. https://t.co/LBvHWkTXnS
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 20, 2020
सूत्रांच्या माहितीनुसार कनिका काही दिवसांपूर्वीच लंडनवरून लखनऊला परतली होती. त्यानंतर तिनं एका अलिशान हॉटेलमध्ये डिनर पार्टी दिली होती. ज्यात बरेच अधिकारी, राजकीय नेता आणि सामाजिक लोकांचा समावेश होता. या पार्टीमध्ये वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत राजे सुद्धा उपस्थित होते असं म्हटलं जातं. तसेच युपीचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह हे सुद्धा या पार्टीमध्ये उपस्थित होते. ते सुद्धा कोरोना टेस्ट करुन घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये कसं काय ठेवावं याचा विचार डॉक्टर्स करत आहेत. श्रीदेवींची ‘लेक’ अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा ग्रँड वेडिंगचे UNSEEN फोटो