जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतित चेहरा; शाहरुखच्या व्हायरल फोटोमागचं सत्य..

वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतित चेहरा; शाहरुखच्या व्हायरल फोटोमागचं सत्य..

वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतित चेहरा; शाहरुखच्या व्हायरल फोटोमागचं सत्य..

शाहरुख खानचा (Shahrukh Khan Viral Photo) एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 21 ऑक्टोबरला शाहरुख आर्यनला भेटायला ऑर्थर रोड जेलमध्ये गेला होता. हा फोटो तेव्हाचाच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा  **(Shahrukh Khan)**मुलगा आर्यन खान **(Aryan Khan)**तुरुंगात आहे. जामीन मिळेपर्यंत आर्यनचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. परंतु, सध्या या प्रकरणात विविध खुलासे होत आहेत. किंग खानच्या ‘जन्नत’पासून गौरी खान आणि आर्यन बद्दल मीडिया आणि सोशल मीडियातही चर्चा रंगत आहेत. त्यातच आता शाहरुख खानचा (Shahrukh Khan Viral Photo) एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 21 ऑक्टोबरला शाहरुख आर्यनला भेटायला ऑर्थर रोड जेलमध्ये गेला होता. हा फोटो तेव्हाचाच असल्याचा दावा करण्यात येत आहे. आर्यन तुरुंगात गेल्यापासून शाहरुख चिंतेत असून तहानभूक विसरला आहे. त्याला रात्रीची झोपही येत नाही, असं वृत्त त्याच्या मित्राच्या हवाल्याने माध्यमांनी दिलं होतं. त्यातच आता शाहरुखचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात शाहरुखची दाढी वाढलेली दिसत आहे. डोळे लाल भडक झाले असून डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत आहेत. हा फोटो ऑर्थर रोड जेल बाहेरचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, सत्य वेगळंच आहे. वाचा :  Chala hawa yeu dya मध्ये निलेश साबळेच्या जागी आला नवा अँकर? काय आहे सत्य ? सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो शाहरुखचाच आहे. परंतु, तो ऑर्थर रोड जेल बाहेरचा नाही. तर हा फोटो जुना आहे. व्हायर झालेला फोटो 2017 मधील असून 15मार्चला झालेल्या आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीतील आहे. शाहरुख आलियाला शुभेच्छा देण्यासाठी हटके अंदाजात पोहोचला होता. तेव्हाही शाहरुखची खूप चर्चा झाली होती. शाहरुखच्या कारने एक फोटोग्राफर जखमी झाला होता. त्यानंतर शाहरुखने तात्काळ फोटोग्राफरला मदत केली होती. आपल्या खासगी डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले होते. वाचा :  घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO शाहरुख आर्यन भेट आर्यन खानला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवल्यानंतर शाहरुख 21 ऑक्टोबरला आपल्या लाडक्या लेकाला भेटला. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघा बाप - लेकांची 18 मिनिटे भेट झाली. यावेळी दोघांच्या मध्ये काचेची भिंत होती. तसेच जेलचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. एकमकांना पाहिल्यानंतर शाहरुख आणि आर्यनही भावुक झाले होते. आता आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी 28ऑक्टोबरला होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात