साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत नयनताराचं नाव पहिल्या क्रमांकाला आहे. विशेष म्हणजे नयनताराला साऊथ इंडस्ट्रीमध्ये लेडी सुपरस्टार म्हणूनही संबोधलं जातं. नयनताराचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. चाहते तिच्या प्रत्येक सिनेमासाठी आतुर असतात. परंतु आता नयनताराच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, नयनताराने आता अभिनयाला रामराम ठोकला आहे. आपल्या मुलांसाठी नयनताराने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. परंतु नयनतारा अभिनय सोडून आपलं प्रोडक्शन हाऊस सांभाळणार असल्याचंही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र अद्याप नयनताराने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाहीय.