जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा.... ' अमोल कोल्हे केतकीवर भडकले

'शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा.... ' अमोल कोल्हे केतकीवर भडकले

'शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा.... ' अमोल कोल्हे केतकीवर भडकले

केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील केतकीच्या पोस्टनंतर निषेध व्यक्त केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 मे- अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे (Controversial Facebook Post of Actress Ketaki Chitale) चर्चेत आली आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. केतकीवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील केतकीच्या पोस्टनंतर निषेध व्यक्त केला आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध…महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवारांचे मोलाचं योगदान आहे.

जाहिरात

केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. वाचा- PSI असलेली ‘ही’ अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, मेंदी आणि हळदीचा Video Viral नवी मुंबई येथून पोलिसांनी  घेतलं  केतकी चितळेला  ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणं अभिनेत्री केतकी चितळेला प्रचंड महागात पडलं आहे. कारण शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिला एका रुममध्ये बसून ठेवले आहे. काही वेळातच तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. कळवा पोलीस काही वेळातच कळंबोळी पोलीस ठाण्यात पोहचणार आहेत. कळंबोली पोलीस तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात