Home /News /entertainment /

'कसौटी जिंदगी की' फेम प्राचीन चौहानला अटक; तरुणीसोबत छेडछाड केल्याचा आरोप

'कसौटी जिंदगी की' फेम प्राचीन चौहानला अटक; तरुणीसोबत छेडछाड केल्याचा आरोप

प्राचीन विरोधात पोलिसांनी IPC कलम 354, 342, 323 आणि 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

    मुंबई 3 जुलै: 'कसौटी जिंदगी की' (Kasautii Zindagii Kay) या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता प्राचीन चौहान (Pracheen Chauhan) याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मालाड पुर्व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. (Pracheen Chauhan arrested) तरुणीनं तक्रार केल्यानंतर प्राचीन विरोधात पोलिसांनी IPC कलम 354, 342, 323 आणि 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सैराट फेम तानाजीचं न्यूड फोटोशूट; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का प्राचीननं 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्यानं सुब्रको बसू ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर त्यानं 'कुछ झुकी पलकें', 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे' आणि 'माता पिता के चरणों में स्वर्ग' यांसारख्या काही मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात प्राचीन युट्यूबवरील 'शिटी आइडियाज ट्रेंडिंग' या शोमुळे चर्चेत आहे. ज्यात त्यानं अभिमन्यूची भूमिका साकारली आहे. दरम्यान अटकेप्रकरणी प्राचीननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Entertainment, Tv actor

    पुढील बातम्या