जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रार्थना बेहेरेचा बिग बॉसच्या 'या' सदस्याला पाठिंबा, POST शेअर करत म्हणाली...

प्रार्थना बेहेरेचा बिग बॉसच्या 'या' सदस्याला पाठिंबा, POST शेअर करत म्हणाली...

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत बिग बॉसच्या घरातील एका सदस्यावा पाठिंबा दिला आहे. पाहा कोण आहेत तो सदस्य.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर :  ‘बिग बॉस मराठी 4’ चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे.  बिग बॉस च्या घरात कधी काय घडेल आणि कोणाचा कधी कोणावर पारा चढेल याचा काही नेमच नाही. प्रेक्षक आपला आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. अशातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही तिच्या आवड्या बिग बॉस सदस्याला पाठिंबा दर्शवला आहे. प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत बिग बॉसच्या घरातील एका सदस्यावा पाठिंबा दिला आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसाद जवादे आहे. प्रार्थनाने तिच्या स्टोरीला प्रसाद जवादेचा फोटो शेअर करत वोट फॉर प्रसाद जवादे म्हटलं आहे. पोस्टसोबत हार्ट इमोजीही प्रार्थनाने दिले आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील प्रार्थनाचा आवडता सदस्य प्रसाद जवादे असल्याचं दिसून येतंय.

जाहिरात

आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून सहा स्पर्धक बाहेर पडले आहेत. यामध्ये निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, यशश्री मुसारकर आहेत. आता बिग बॉसच्या घरातील बाहेर पडणारा पुढचा स्पर्धक कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. घरातील सगळ्यांना सध्या किरण माने घराबाहेर गेले असल्याचं सांगण्यात आलंय मात्र ते बिग बॉसच्या घरात असून त्यांना स्पेशल पॉवर मिळाली आहे. त्यामुळे ते सध्या सिक्रेट रुममध्ये आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, आज होणाऱ्या भागात स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिलं आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हे कार्य असं आहे कि, ‘जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल. आता त्या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांत भिडले आहेत. एका टीममध्ये अपूर्वा आणि अक्षय तर दुसऱ्या टीममध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात