Home /News /entertainment /

'जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव....' किरण मानेंची पोस्ट चर्चेत

'जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव....' किरण मानेंची पोस्ट चर्चेत

केतकी चितळेचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांनी देखील फेसबुक पोस्ट करत या सर्व प्रकरणावर सविस्तर मत मांडलं आहे.

    मुंबई, 14 मे-  अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. केतकी चितळेला ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. तिचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांनी देखील फेसबुक पोस्ट करत या सर्व प्रकरणावर सविस्तर मत मांडलं आहे. किरण माने यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने यांची नेमकी फेसबुक पोस्ट काय आहे ? अभिनेते किरण माने नेहमीच समाजातील विविध विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मत मांडताना दिसतात. राजकीय, सामाजिक अशा विविध विषयावर ते स्पष्ट मत मांडताना दिसतात. आज सकाळपासून अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत आहे. याच पोस्टवर आता अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियाचा आधार घेत मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छीतो. अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नवीन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की 'लेडीज कार्ड' खेळून 'गैरवर्तना'चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा 'गट' जमवला..हळूहळू कुरबूरी सुरू केल्या.. आणि... असो. बात निकलेगी तो दूSर तलक जायेगी. वाचा-'स्त्रीत्वाच्या आड लपून विष ओकनारी प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे', आव्हाड संतापले अशा विकृतांच्या अनेक हिडीस घटना, बेताल-बिभत्स वागणे आमच्या अख्ख्या युनिटने पाहिलेय. पण अशा गोष्टी उघड करून कुणाच्या चारीत्र्यावर चिखलफेक करणं ही आपली संस्कृती नाही. पण त्याचवेळी केवळ आपल्या विरोधी विचारसरणीचे आहेत म्हणून, नेत्यांपासून महामानवांबद्दल अर्वाच्य, घृणास्पद बोलणे सहन नाही करू शकत. ...असह्य होऊन आपण बंड करून उठलो, तर त्याच अभिनेत्री नंतर पुरोगामी विचारांच्या नेत्यांचे, खासदारांचे कान भरून 'उलट्या बोंबा' कशा मारतात आणि आपले नेते त्यांची बाजू कशी घेतात, ते ही मी 'याची देही याची डोळा ' पाहीलेय. मी भक्कम आहे. कुणाचा मिंधा नाही. पोटासाठी लाचार होणारा नाही. म्हणून पुरून उरलोय या विकृतांना. बाकी कलाकारांची काय घुसमट होत असेल कोण जाणे. सविस्तर लिहीणार आहे योग्य वेळी. वाचा-'विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टवर निषेध व्यक्त आधी कुजबूज स्वरूपात अशा वल्गना चालायच्या...गेल्या पाचसहा वर्षांत सेटवर मोठ्या आवाजात उघडपणे सुरू झाल्या.. आता पोस्ट करण्यापर्यन्त मजल गेली ! त्यामुळे ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे. असो. आज छ. संभाजी महाराज जयंती ! 'बुधभूषण' या ग्रंथात छ. संभाजी महाराज म्हणतात, "आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घरातला पुरूष घरात नसेल, तर त्या घराचा उंबराही ओलांडू नये." ..याला म्हणतात संस्कार ! तरीही मनूवाद्यांनी शंभूराजांना महिलांविषयी वर्तनाचे खोटे आरोप ठेवून बदनाम केले.. पण काळाच्या ओघात वर्चस्ववाद्यांचे कारस्थान भेदून राजेंचे स्वच्छ, नितळ, निर्मळ चारीत्र्य लखलखून वर आले. स्वत: सततच्या लढायांमध्ये गुंतलेले असताना शंभूराजेंनी रायगडाचा मुलकी व्यवहार महाराणी येसूबाईंच्या हाती सोपवला होता. महिलेला पंतप्रधानपद देणारा पहिला राज्यकर्ता ! एवढेच नव्हे, तर त्यांनी येसूबाईंची मुद्रा चलनी नाण्यावर छापली होती.. साडेतीनशे वर्षांपूर्वी महिलेला हा सन्मान देणार्‍या महापराक्रमी महापुत्राला विनम्र अभिवादन !!! , किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या