मुंबई, 23 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या अभिनेत्री टेनिस स्टार लिएंडर पेसला (Leander Paes) डेट करत आहे. दोघांची लव्ही -डव्ही फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. डेटिंगवर दोघांनी कोणतीही अद्याप प्रितिक्रिय दिलेली नाही. मात्र दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर लक्षात येते की, दोघे ही एकमेकांच्या प्रेमात आहेत. 21 जानेवारीला किम शर्माने**(Kim Sharma Birthday)** तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्यासोबत लिएंडर देखील होता. 21 जानेवारी, शुक्रवारी किम तिचा 42 वाढदिवस साजरा करण्यासाठी लिएंडर पेससोबत बहामासला गेली. या ठिकाणावरून सध्या ती सुंदर फोटो शेअर करत आहे. या फोटोंमध्ये किम शर्मा समुद्र किनारी बिकिनी घालून पोज देताना दिसत आहे. या फोटोत तिनं कॅमेऱ्याकडे पाठ केली आहे. वाचा- विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, अभिनेत्याने FB पोस्ट करत दिली माहिती किन शर्माने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 2022साठी मू़ड. स्वर्गात माझ्या सर्वात चांगल्या व्यक्तीसोबत सर्वात चांगला दिवस. हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात चांगले वर्ष आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा! #42. किमने तिचे हे फोटो लिएंडर पेसला देखील टॅग केले आहेत. याआधी लिएंडरने देखील किमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लिएंडर पेसने किम शर्माच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टावर एक रोमॅंटिक पोस्ट केली होती. त्याने फोटो पोस्ट करत म्हटले होते की, ‘हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग. तुझ्यासाठी माझी एक इच्छा आहे की, येणारं वर्ष तुझ्यासाठी जादूई ठरो. किम आणि लिएंडरने मागील वर्षी डिसेंबरमध्ये इन्स्टावर रिलेशनशिप असल्याची हिंट दिली होती. दोघांनीही सोशल मीडियावर रोमॅंटिक फोटो शेअर करत त्यांच्यात काय तरी शिजत असल्याची हिंट दिली होती. .