Home /News /entertainment /

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, FB पोस्ट करत दिली माहिती

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, FB पोस्ट करत दिली माहिती

Prithvik Pratap

Prithvik Pratap

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyjatra) या विनोदी कार्यक्रमातील कलाकार पृथ्विक प्रतापसोबत (Prithvik Pratap)एक धक्कादायक प्रकार घडलां.

    मुंबई, 23 जानेवारी: सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyjatra) या विनोदी कार्यक्रमातील कलाकार पृथ्विक प्रतापसोबत (Prithvik Pratap)एक धक्कादायक प्रकार घडलां. त्याने फेसबुक पोस्ट करत आपल्या चाहत्यांसोबत आपल्याला रिक्षावाल्याकडून झालेल्या लुटमारीचा आलेला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदी कलाकार पृथ्विक प्रताप याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने शूटिंग आटोपल्यानंतर घरी परतताना एका रिक्षाचालकाने त्याच्यासोबत जे काही केले आणि त्यातूनत तो कसा सुखरुप बचावला हा सारा अनुभव त्याने पोस्ट मध्ये सांगितला आहे. पृथ्विक प्रताप काल शूटिंग संपवून काशीमीरा परिसरातून ठाण्याला जात होता त्यासाठी त्याने रिक्षा पकडली होती. मात्र रिक्षाचालक ठाण्याला जाण्याऐवजी वसईच्या दिशेने जाऊ लागला त्यानंतर दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. पृथ्विकने पोलिसांना फोन करताच तो थांबला आणि भांडू लागला आणि पोलीस आल्याचे बघून पळून गेला. हा सर्व घटनाक्रम पृथ्वीक पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. काय म्हटले आहे फेसबुक पोस्टमध्ये दरम्यान पृथ्विक प्रतापची ही फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विनोदी पात्र साकारत असतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातही त्याने काम केले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या