OMG! ही अभिनेत्री कि जलपरी? खोल समुद्रातील VIDEO पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

OMG! ही अभिनेत्री कि जलपरी? खोल समुद्रातील VIDEO पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

अगदी समुद्राच्या तळाला जाऊन ती तेथील सौंदर्याचा आनंद घेतेय. तिच्या या व्हिडीओनं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

  • Share this:

मुंबई 8 जून: कियारा अडवाणी (Kiara Advani) ही बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. कबीर सिंग या चित्रपटातून नावारुपास आलेली कियारा चित्रपटांसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओज कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. कियाराचा असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. (Kiara Advani Underwater Swimming Video) हा व्हिडीओ पाहून तुही देखील विचारात पडाल ही कियारा आणि जलपरी?

कियारानं खोल समुद्रात स्विमिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एखाद्या जलपरी किंवा माशाप्रमाणे स्विमिंग करताना दिसत आहे. अगदी समुद्राच्या तळाला जाऊन ती तेथील सौंदर्याचा आनंद घेतेय. तिच्या या व्हिडीओनं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. आतापर्यंत कोट्यवधी नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत कियाराच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

श्वेता तिवारीची उडाली झोप; या कारणामुळं रात्रभर सुरू ठेवावा लागतो व्हिडीओ कॉल

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सारा अली खाननं रियाला ऑफर केला होता गांजा; NCB चौकशीत मोठा खुलासा

कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे दोघं एकमेंकांना डेट करत आहेत. हे दोघं मालदीवमध्ये एकत्र प्रवास आणि सुट्टीत धमाल करताना दिसले होते. सिद्धार्थ किंवा कियारा या दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्वत: सांगितलं नसलं तरी एका मुलाखती दरम्यान कियारानं उघड केलं होतं की या वर्षाच्या सुरुवातीलाच ती एका व्यक्तीबरोबर रोमँटिक डेटवर गेली होती. हा व्हिडीओ तिनं त्याचं रोमँटिक डेटवर शूट केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by: Mandar Gurav
First published: June 8, 2021, 12:38 PM IST

ताज्या बातम्या