मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

श्वेता तिवारीची उडाली झोप; या कारणामुळं रात्रभर सुरू ठेवावा लागतो व्हिडीओ कॉल

श्वेता तिवारीची उडाली झोप; या कारणामुळं रात्रभर सुरू ठेवावा लागतो व्हिडीओ कॉल

श्वेता सध्या केपटाऊनमध्ये खतरों के खिलाडी (Fear Factor: Khatron Ke Khiladi) या टीव्ही शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र तिचं संपूर्ण लक्ष आपल्या दोन मुलांकडे आहे.

श्वेता सध्या केपटाऊनमध्ये खतरों के खिलाडी (Fear Factor: Khatron Ke Khiladi) या टीव्ही शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र तिचं संपूर्ण लक्ष आपल्या दोन मुलांकडे आहे.

श्वेता सध्या केपटाऊनमध्ये खतरों के खिलाडी (Fear Factor: Khatron Ke Khiladi) या टीव्ही शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र तिचं संपूर्ण लक्ष आपल्या दोन मुलांकडे आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 जून: श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चाळीशीनंतरही आपल्या ग्लॅमरस अदांनी घायाळ करणारी श्वेता आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेली श्वेता वैयक्तित आयुष्यात मात्र कधीच स्थिरस्थावर होऊ शकली नाही. सध्या ती केपटाऊनमध्ये खतरों के खिलाडी (Fear Factor: Khatron Ke Khiladi) या टीव्ही शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र तिचं संपूर्ण लक्ष आपल्या दोन मुलांकडे आहे. (Shweta Tiwari cant sleep) त्याच्या काळजीमुळं रात्रभर तिला झोप लागत नाही. सतत व्हिडीओ कॉलिंगद्वारे ती आपल्या मुलांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सारा अली खाननं रियाला ऑफर केला होता गांजा; NCB चौकशीत मोठा खुलासा

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली, “मी व्हिडीओ कॉल सुरु करुन झोपते. जेणेकरुन मुलांनी हाक मारताच मला जाग येईल. मी त्यांच्यापासून दूर आहे याची जाणीव त्यांना होणार नाही. अन् मला देखील. सकाळ होताच पहिल्यांदा मला हाक मारण्याची सवय त्यांना आहे. व्हिडीओ कॉलिंगमुळं या सवयीत खंड पडला नाही. आपल्या कामाबद्दल पुढे बोलताना ती पुढे म्हणाली, “खरं तर, आपल्या सर्वांसाठी हा एक कठीण काळ आहे. मी माझ्या मुलांबरोबर आणि कुटूंबियांसोबत घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञ आहे. काम करणं किती महत्त्वाचx आहे हे माझ्या लक्षात आलं. जर काम थांबलं तर सर्व काही थांबतं. आपलं उत्पन्न थांबेल, परंतु खर्च कदाचित थांबणार नाहीत. तुम्हाला ईएमआय आणि इतर खर्च द्यावे लागतील. म्हणूनच काम करणं महत्वाचं होतं.”

दीपिका-कतरिनाला सोडलं मागे; रिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री

श्वेता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील सतत चर्चेत असते. अलिकडेच तिचा घटस्फोटित पती अभिनव कोहली यानं तिच्यावर गंभीर आरोप केले होते. ती त्याला दांड्यानं मारायची असं तो म्हणाला होता. “श्वेता खोटं बोलतेय. ती प्रसिद्धीसाठी कोणावरही काहीही आरोप करु शकते. मी तिच्यावर कधीही अत्याचार केलेले नाहीत. हो श्वेताला मी एकदा चापटी मारली होती पण तो प्रकार केवळ एकदाच घडला होता. तो प्रसंग सोडला तर मी श्वेतावर कधीही हात उचललेला नाही. उलट श्वेताच मला दांड्यानं मारायची. तिच्या आरोपांवर कृपया विश्वास ठेवू नका.” असं तो स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

First published:

Tags: Entertainment, Shweta tiwari, Tv actress