मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सारा अली खाननं रियाला ऑफर केला होता गांजा; NCB चौकशीत मोठा खुलासा

सारा अली खाननं रियाला ऑफर केला होता गांजा; NCB चौकशीत मोठा खुलासा

सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिनं तिला गांजा ऑफर केला होता असा दावा तिनं केला आहे. इतकंच नव्हे तर गांजाच्या हँगओव्हरमधून बाहेर कसं पडायचं? याबाबतही तिनं रियाला माहिती दिली होती.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 7 जून: सुशांत सिंग राजपूत (Sushant singh rajput death case) मृत्यूप्रकरणातील संशयीत आरोप रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) NCB द्वारे सध्या चौकशी सुरु आहे. अभिनेत्याला अंमली पदार्थांचं व्यसन लावून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीत तिनं धक्कादायक खुलासे केले आहेत. सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिनं तिला गांजा ऑफर केला होता असा दावा तिनं केला आहे. इतकंच नव्हे तर गांजाच्या हँगओव्हरमधून बाहेर कसं पडायचं? याबाबतही तिनं रियाला माहिती दिली होती.

दीपिका-कतरिनाला सोडलं मागे; रिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री

झी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार रियानं चौकशीत साराचं देखील नाव पुढे केलं आहे. तिनं रियाला गांजा ऑफर केला होता. “सारा अली खान हातानं रोल करून गांजाची सिगारेट तयार करत असे. ती माझ्यासोबत ही सिगारेट शेअर करत असे. 6 जून 2017 मध्ये सारानं तिच्या घरी मला वोडका आणि गांजा ऑफर केला होता. शिवाय या अंमली पदार्थांची नशा चढल्यावर त्यातून बाहेर कसं पडायचं याचा उपाय देखील सांगितला होता.” असा दावा रियानं NCBला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये केला आहे. शिवाय आपला दावा सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे काही वॉट्सअप मेसेज देखील आहेत.

‘सुशांतच्या बहिणीनंच लावली ड्रग्जची सवय’; NCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

रियाच्या या आरोपांवर सारा अली खाननं अद्याप कुठलंही प्रत्युत्तर दिलेलं नाही. परंतु लवकरच NCB तिची देखील चौकशी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सारा आणि सुशांतनं केदारनाथ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. त्यानंतर ते दोघंही एकत्र व्हेकेशनसाठी गेल्याचंही बोललं गेलं होतं. पण नंतर सारा आणि सुशांतचं ब्रेकअप झालं आणि सुशांतच्या आयुष्यात रियाची एण्ट्री झाली.

First published:

Tags: Rhea chakraborty, Sara ali khan, Sushant Singh Rajput